Trimbakeshwar News Saam tv
महाराष्ट्र

Trimbakeshwar News: रस्त्याअभावी माचीपाडाच्या बाळंतीन महिलेला डोलीचा आसरा; त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घटना

Nashik News रस्त्याअभावी माचीपाडाच्या बाळंतीन महिलेला डोलीचा आसरा; त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घटना

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी बांधवांचा संघर्ष पाचवीला पुजलेला आहे. कालच देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात (Nashik) साजरा करण्यात आला. तर याच दिवशी माचीपाडा येथे एका गर्भवती महिलेने रात्री उशिरा बाळाला जन्म दिला. यानंतर आज (Trimbakeshwar) सकाळी आईला डोली करून तीन ते चार किलोमीटर पायपीट करून अन् बाळाला पदरात गुंडाळून दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले. (Maharashtra News

मोठ्या उत्साहात देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. अवघा देश देशभक्तीचे गोडवे गात असताना दुसरीकडे आरोग्य सुविधेअभावी एका माऊलीला स्वातंत्र्यदिनीच घरातच प्रसूती करण्याची वेळ आली. काही दिवसांपूर्वीच इगतपुरी तालुक्यात महिलेला डोली करून दवाखान्यात नेल्याचं समोर आलं होत. यानंतर यंत्रणा फक्त हलल्या, त्यावर उपाययोजना झाल्याचं नाहीत. आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातीलच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैरायपाली ग्रामपंचायत अंतर्गत येणारा माचीपाडामध्ये स्वातंत्र्यदिनीच विदारक परिस्थिती समोर आली. 

माचीपाडा ते प्राथमिक (Health Department) आरोग्य केंद्र तीन ते चार किलोमीटरच अंतर असून १५ ऑगस्टच्या दिवशी उशिरा गावातील एका महिलेला प्रसूतिवेदना सुरु झाल्या. मात्र गावात रस्ता नसल्याने जाण्यायेण्याचे साधनही नव्हते. त्यामुळे घरीच प्रसूती झाली. तर आज सकाळी डोली करून बाळासह महिलेला दवाखान्यात आणण्यात आले. गावात येण्याजाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यानं अनेकदा रुग्णांना डोली करून रुग्णालयात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येतेय. त्यामुळे रस्ता तयार करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Gift Reel: सोनपापडी नाही! दिवाळीला असं गिफ्ट दिलं की लोकांनी विचारलं व्हॅकेन्सी आहे का? व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० लोकल स्टेशन्सचं होणार कायापालट, लवकरच रेल्वेच्या नियंत्रणात जाणार

Diwali 2025 : जेवणाचा मेन्यू ठरला! फक्त ३० मिनिटांत बनेल स्पेशल थाळी, एकदा ट्राय तर करा 'या' सिंपल रेसिपी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT