Nashik Tragedy Saam TV News
महाराष्ट्र

Nashik: कृत्रिम तलावात तिघं पोहायला गेले, श्वास कोंडला अन् बुडून मृत्यू; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Tragedy: नाशिकमधील बांधकाम साईटवरील कृत्रिम तलावात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

तबरेज शेख, साम टिव्ही

बांधकाम साईटवर तयार केलेल्या कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. ही ह्रदयद्रावक घटना नाशिकमधून उघडकीस आली आहे. कालपासून तिन्ही अल्पवयीन मुले बेपत्ता होती. कृत्रिम तलावात बुडून तिन्ही मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तिघांचा मृतदेह तलावातून बाहेर काढले. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तिघा मुलांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दुपारपासून तिन्ही मुलं बेपत्ता होती. त्यानंतर मृत मुलांच्या कुटुंबाने तिघांचा शोध घेण्यास सुरूवात केली. बिडी कामगार परिसारातील कृत्रिम तलावाच्या काठाजवनळ मुलांचे कपडे आढळले. त्यानंतर मुले पोहण्यासाठी गेली असावी अंदाज बांधण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी धाव घेत शोध मोहिमेला सुरूवात केली.

अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले. त्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर कुटुंबाने हंबरडा फोडला. या घटनेची माहिती आडगाव पोलिसांना देण्यात आली असून, त्यांनी या घटनेचा अधिक तपासाला सुरूवात केली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच शोककळा पसरली आहे.

विनयभंग प्रकरणातील तपास आयपीएस महिला अधिकाऱ्यांकडे वर्ग

बीड शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस उमाकिरण विनयभंग प्रकरणातील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणातील तपास आयपीएस महिला पोलीस अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून, तपास आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

SCROLL FOR NEXT