nashik tcs news  Saam tv
महाराष्ट्र

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

nashik tcs news : नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणाचे धागेदारे छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचलेत. अशातच आता संभाजीनगरच्या MIMच्या नगरसेवक मतीन पटेलवर आपलं नगरसेवकपद गमावण्याची नामुष्की कशी ओढावलीये? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणातली आरोपी निदा खानला घरात आश्रय देणं संभाजीनगरचे MIMचे नगरसेवक मतीन पटेलला चांगलंच भोवणार असल्याचं दिसतंय. या प्रकरणात सहआरोपी केल्यानंतर आता मतीन पटेलचं नगरसेवकपदही धोक्यात आलंय. तसा इशाराच महापौर समीर राजूरकर दिलाय.

फरार झालेल्या निदाच्या अटकेनंतर मतीन पटेल आणि निदा खानचं कनेक्शन उघड झालं होतं...

23 मार्चला भिवंडीतून बेपत्ता झालेली निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव भागात एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती. धक्कादायक बाब म्हणजे, हे घर MIMचे नगरसेवक मतीन पटेलचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या काळात निदा आणि तिच्या कुटुंबाला किराणा, चिकन आणि इतर दैनंदिन वस्तू पुरवण्याचे काम नगरसेवकाच्या ड्रायव्हरमार्फत केले जात असल्याचा संशय आहे. मतीन पटेलच्या कैसर पार्क येथील घरात निदा खान आणि तिचे संपूर्ण कुटुंब गुप्तपणे वास्तव्यास होते.

खरंतर, 'टीसीएस' कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाचे धागेदोरे एमआयएमपर्यंत पोहोचलेत. एकीकडे, मतीन पटेल यांच्या नावावर असलेली घरे अनधिकृत असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे निदाला मदत करणाऱ्या मतीनला घरासह नगरसेवकपदालाही मुकावं लागणार की काय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

SCROLL FOR NEXT