Investigation intensifies in Nashik case after doctor raises doubts over Nida Khan’s pregnancy claim. saam tv
महाराष्ट्र

Nashik TCS Case: नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गर्भवती होती की नव्हती? डॉक्टरांनी सांगितलं सत्य

Nashik TCS Conversion Case : नाशिक धर्मांतर प्रकरणात एक धक्कादायक खुलासा, कारण डॉक्टरांनी आरोपी निदा खानच्या गरोदरपणाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नवीन पुराव्यांसह तपासाला आता नवीन वळण लागले आहे.

Bharat Jadhav

नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणात आरोपी असलेल्या निदा खानबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. फरार असलेली निदा खान ही नाशिकमधून फरार झाल्यानंतर मुंबईत होती, असा संशय उपस्थित होत आहे. इतकेच नाहीतर निदा खान गर्भवती असल्याचा दावा वकिलांनी केला होता. आता तिचे वैद्यकीय कागदपत्र समोर आली आहेत. निदा खानने १३ एप्रिल रोजी मुंबईमधील एका डॉक्टरांची भेट घेत त्यांच्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेतली होती.

त्यामुळे फरार असताना निदा खान मुंबईमध्ये उपस्थित होती का? असा मोठा प्रश्न पोलीस तपासातून निर्माण झाला आहे. डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणी न करता प्रमाणपत्र दिल्याचा संशयदेखील उपस्थित होतोय. या कागदपत्रांमुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान निदा खान ज्या रुग्णालयामध्ये उपचार घेत होती. त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

निदा खान या मुंबईतील डॉक्टरांकडे दोनदा आली होती. ११ आणि १३ एप्रिल रोजी आली होती. पहिल्या भेटी वेळी तिच्या नवऱ्यासोबत आली होती. दुसऱ्यांदा एकटी आली होती. ती गर्भवती असल्याचं सांगितलं. यासह तिने डॉक्टरांना घरी केलेल्या टेस्ट किट्स दाखवले. त्यानंतर डॉक्टरांनी तिला नॉर्मल प्रेग्नन्सची ट्रीटमेंट दिली.

दुसऱ्या १३ एप्रिलला निदा आली तेव्हा तिने त्यांना प्रवास करण्यास आणि अशक्तपणा येत असल्याचं सांगितलं होतं. त्यावरून डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला. पण त्यावेळी तिने दोन-तीन आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांसाठी सुट्टी मिळेल का असं डॉक्टरांना विचारलं होतं. निदा खानने अटक पूर्व जामीन अर्ज केला होता. वैद्यकीय कारणामुळे नाशिक न्यायालयात हजर राहू शकत नसल्याचं अर्जात म्हटलं होतं. दरम्यान निदा खान सध्या मुंबईत असून ती गरोदर आहे, असे तिच्या कुटुंबीयांनीही सांगितलं होतं. खानने आपल्या अर्जात वैद्यकीय कारण देत नाशिकमधील स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur : लातूरमध्ये मतिमंद विद्यार्थ्याला फळी तुटेपर्यंत मारलं; शिक्षकाच्या क्रूरतेचा Video व्हायरल

Nashik Shocking : TCS प्रकरणानंतर आणखी एक भयानक कांड; तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ काढली अन् दारू पाजून केला बलात्कार

परभणीत घडलं भयानक हत्याकांड; तरुणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या, नातेवाईकांचा आक्रोश

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील जे डब्लू पाडेघर येथील गोडाऊनला भीषण आग

Gold Rate: अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याला चकाकी, १० तोळा सोनं ११००० रुपयांनी महागलं; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

SCROLL FOR NEXT