Nashik TCS Case Update News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik TCS Case : लैंगिक शोषण अन् अश्लील टोमणे...; नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणात २० तरुणींनी सांगितली आपबीती

Nashik TCS Case Update News : नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. SIT तपासात अनेक तक्रारी समोर आल्या असून महिलांनी कार्यस्थळी छळ आणि अपमान केल्याचे आरोप केले आहेत.

Alisha Khedekar

  • नाशिक TCS प्रकरणात लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

  • हेल्पलाईनवर २० पेक्षा अधिक तक्रारी, पण FIR दाखल करण्यास महिलांचा नकार

  • ७ आरोपी अटकेत, मुख्य आरोपी फरार

  • POSH कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

नाशिकच्या बहुराष्ट्रीत TCS कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात आता नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. SIT च्या पथकाने जारी केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर आतापर्यंत बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या तरुणींना ऑफिसमध्ये ‘प्लेअर’ म्हणून हिणवल्याचे आरोप करण्यात आले आहेत. हेल्पलाईन क्रमांकावर तक्रारींचा पाऊस सुरु असताना प्रत्यक्षात मात्र कोणीही पुढे येऊन गुन्हा दाखल करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

नाशिकच्या बहुराष्ट्रीत TCS कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण तसेच त्यांचे धर्मांतर केलं जात असल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. या प्रकरणात एकूण ७ जणांना अटक करण्यास पोलिसांना यश आलं आहे, तसेच या सगळ्या घटनेतील मुख्य सूत्रधार असलेली कथित HR निदा खान मात्र अद्यापही फरार आहे. निदा खान गरोदर असल्याचे काही दिवसांपूर्वी तिच्या मेडिकल रिपोर्ट्सवरून समोर आले. ती सध्या कुठे आहे या बद्दल कोणालाही ठाऊक नसून आधी ती भिवंडी नंतर मुंब्य्रात राहत असल्याचे तपासात समोर आले.

निदा खान आणि इतर आरोपींनी मिळून ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा छळ केला. व्हाट्सअँप ग्रुपवरून संवाद साधून महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर करण्यास ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना भाग पाडलं जायचं. महिलांना अश्लील टोमणे मारले जायचे, तसेच त्यांच्या वैयक्तित आयुष्याबद्दल शेरेबाजी केली जायची आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे वक्तव्य केलं जायचं. धक्कादायक म्हणजे नव्याने रुजू झालेल्या तरुणींना आरोपी प्लेयर म्हणून हिणवायचे.

या प्रकरणाचा पुढील तपास SIT करत असून हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर SIT च्या पथकाने एक पीडित महिलांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला होता. या नंबरवर २० पेक्षा अधिक तरुणींनी तक्रारी दाखल केल्या. मात्र प्रत्यक्षात गुन्हा दाखल करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचं निदर्शनास आले आहे. दाखल झालेल्या तक्ररींमध्ये लैंगिक शोषण, अपमान, अश्लील प्रश्न, हावभाव आणि जवळीक साधण्याचे प्रयत्न केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

एका तरुणीने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी तिला प्लेयर म्हणून बोलवायचा. पाठलाग करून बाहेर भेटण्यास दबाव टाकायचा. एवढेच नाही तर जून २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान सतत छळ सहन केल्याचा दावा तरुणीने तक्रारीत केला आहे. या तक्रारीनंतर कार्यस्थळी सुरक्षेवर आणि POSH कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान याप्रकरणात आता पर्यंत अटक झालेल्या आरोपींनी जामिनासाठी अर्ज, जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला आहे. यासाठी येत्या २ तारखेला सुनावणी होणार असून याबाबत काय निर्णय घेतला जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti Tips: 'या' 4 ठिकाणी दान केल्यास व्हाल मालामाल, चाणक्यांनी सांगितले झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग

Ladki Bahin Yojana: १२००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; २३ कोटी रुपये लाटले; धक्कादायक माहिती उघड

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला

Ranveer Singh : बॉलिवूडचा 'धुरंधर' झाला कास्टिंग काउचचा शिकार, किस्सा वाचून अंगावर येईल काटा; म्हणाला - 'प्रोड्यूसरने मला पार्टीला बोलावले अन्...'

Kidney Damage Habits : सावधान! दररोजच्या ५ चुका पडतील महागात, किडनी होईल फेल; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT