Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Nashik Crime News : नाशिकमध्ये विहिरीत कासव पाहायला सांगून तिघांना ढकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक : नाशिकमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन अल्पवयीन चिमुकल्यांना विहिरीत लोटून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडगावर पिंगळमधील घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शाळकरी मुलांच्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळमध्ये शाळकरी मुलांना विहिरीत कासव असल्याचं सांगितलं. त्यानंतर विहिरीत कासव पाहण्यासाठी तिघे विहिरीजवळ गेले. विहिरीत डोकावून पाहताना संशयित तिघांनी तिन्ही शाळकरी मुलांना विहिरीत ढकललं. जीवे मारण्याच्या हेतूनेच विहिरीत ढकल्याचा तिघांच्या आई-वडिलांचा आरोप आहे.

तीन अल्पवयीन मुलांना विहिरीत लोटून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे. तिन्ही शाळकरी मुलांना विहिरीत ढकलल्यानंतर एकाने विहिरीतील दोरीला पकडून स्वत:ला सावरत इतर दोघांचा जीव वाचवला. या घडलेल्या घटनेनंतर तिघांनी आई-वडिलांना संपूर्ण कैफियात सांगितली. या तिघांच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकारानंतर सिन्नर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरु केला आहे. सिन्नर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु करण्यात आला आहे. तिन्ही शाळकरी मुलांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने विहिरीत लोटून दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दोन कैदी भिडले

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दोन कैदी आपापसात भिडल्याची घटना घडली आहे. या भांडणात कन्हैयालाल चूनियाल या कैदीच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या कैद्याच्या डोक्यात फरशी टाकून त्याला जखमी केले आहे. त्याला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सूरज उगलमुगले या कैद्याने हा हल्ला केला. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून नाशिकरोड पोलीस तपास करत आहेत. कैद्यांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT