nashik news Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : नाशिक हादरलं! बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास प्रवृत्त, अल्पवयीन मुलीनं आयुष्याचा दोर कापला

Nashik News : नाशिकच्या अंबड परिसरात तीन तरुणांच्या छळामुळे आणि सोशल मीडियावरील बदनामीमुळे अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने परिसरात संतापाचे वातावरण असून, पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकच्या अंबड येथे अल्पवयीन मुलीची आत्महत्या

  • प्रेमसंबंधाचा दबाव आणि सोशल मीडियावरील बदनामी मुख्य कारण

  • तिन्ही संशयितांवर गुन्हा दाखल, एक आरोपी फरार

  • घटनेने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला

नाशिकमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंबड परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने महाविद्यालयीन स्तरावर सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्याचा दबाव, शिवीगाळ, सोशल मीडियावरून केलेली बदनामी आणि सततचा छळ या कारणांमुळे या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. त्याच महाविद्यालयात शिकणारे गणेश भांगरे, अक्षय वरठे आणि अतिश वैद्य या तिघांनी तिला प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. विशेषत: गणेश भांगरेसोबत जबरदस्ती प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली जात होती. मात्र मुलीने ठाम नकार दिल्यामुळे संशयित अतिश वैद्यने तिचे इन्स्टाग्राम आयडी व पासवर्ड घेतले. त्यावर तिचा एका मुलासोबत गळ्यात हात टाकलेला फोटो पोस्ट करत ‘बॉयफ्रेंड आहे’ असा मजकूर लिहला. या पोस्टमुळे महाविद्यालयीन परिसरात तिची प्रतिमा मलिन झाली व बदनामी झाली.

याचदरम्यान गणेश भांगरे याने मुलीला वारंवार फोन करून शिवीगाळ केली आणि तिला धमकावले. सततच्या या मानसिक छळामुळे ती प्रचंड नैराश्यात गेली. अखेरीस तिने आपल्या घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले. घरच्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: अल्पवयीन मुलींवर होणारा मानसिक छळ आणि सोशल मीडियाचा गैरवापर किती घातक ठरू शकतो याचे हे गंभीर उदाहरण मानले जात आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

घटनेनंतर अंबड पोलिसांनी गणेश भांगरे, अक्षय वरठे आणि अतिश वैद्य या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र यातील अतिश वैद्य हा संशयित फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुढील तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asim Sarode On Atharva Sudame: अथर्व सुदामेसाठी असीम सरोदे मैदानात, थेट राज ठाकरेंना लावला फोन| पाहा व्हिडिओ

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

Shocking: प्रियकराची सटकली, प्रेयसीच्या तोंडात कोंबली स्फोटकं; स्फोटानंतर चेहरा झाला छिन्नविछन्न

SCROLL FOR NEXT