Nashik Bus Fire Update Saam tv
महाराष्ट्र

Nashik Bus Fire: नाशिकमध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; छत्रपती संभाजीनगरला जाणारी शिवशाही बस जळून खाक

Nashik Shivshahi ST Bus Fire: नाशिकमधून धक्कादायक वृत्त हाती आली आहे. नाशिकवरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या शिवशाही एसटी बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अजय सोनवणे, नाशिक

Nashik Shivshahi Bus Fire:

नाशिकमधून बसला आग लागल्याचं धक्कादायक वृत्त हाती आली आहे. नाशिकवरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या शिवशाही एसटी बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत शिवशाही बस जळून खाक झाली आहे. नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

कुठे घडली घटना?

नाशिकमध्ये पुन्हा एकदा बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. नाशिकमध्ये शिवशाही एसटी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. बसला अचानक लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली आहे.

नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर ही बसला आग लागल्याची घटना घडली. निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील टाकळी फाट्याजवळी डोंगराई हॉटेलसमोर शिवशाही बस जळून खाक झाल्याची घटना घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बसमध्ये होते २५ प्रवासी

नाशिकवरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या शिवशाही एसटी बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. याबसमधील प्रवासी आणि चालक वाहक सुखरूप आहेत. आगीचे कारण जरी अस्पष्ट असले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बसला अचानक आग लागल्यानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती.

नगरमध्ये ऊसाच्या ट्रकचा मोठा अपघात

अहमदनगरमध्ये शनिवारी श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावात उसाने भरलेला ट्रक उलटल्यामुळे मोठा अपघात झाला. ऊसाने भरलेला ट्रक उलटल्याने त्याखाली दबून एका पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेत दोन जणांचा अपघात झाल्याची घटना घडली. शनिवारी सायंकळी सहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. ऊसाने भरलेला ट्रक खंडाळा गावात उलटला. त्यावेळी रस्त्यावरून उषाबाई विघावे ही महिला ट्रकमधील ऊसाखाली दबली गेली. या घटनेत या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

SCROLL FOR NEXT