नाशिकमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिकेकडून अमानुष मारहाण SaamTvNews
महाराष्ट्र

नाशिकमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिकेकडून अमानुष मारहाण

वर्गाच्या खिडकीची काच फुटल्याच्या कारणावरून केली जबर मारहाण; स्कॉटिश अकॅडमी मधली घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- तबरेज शेख

नाशिक : नाशिक येथील जेल रोड भागात असणाऱ्या स्कॉटिश अकॅडमी (Scottish Academy) या शाळेत काच फुटली म्हणून दहावीच्या सहा ते सात विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक महिलेकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. (Inhumane beating of students at Nashik Scottish Academy by the headmistress)

स्कॉटिश शाळेत (School) दहावीच्या वर्गात खिडकीची काच फुटल्या मुळे  5 ते 6 विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना मारहाण (Beating) करून त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून नुकसान भरपाई म्हणून 5 हजारांची मागणी करण्यात आल्याने पालक चांगलेच संतापले. याप्रकरणी एका विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली आहे. मारहाण केल्यानंतर पोलिसात जाल तर मुलांचे दहावीचे वर्ष बरबाद करू अशी धमकी देण्यात आल्याचे पालकांनी सांगितले.

काही मुले दहावी परीक्षेच्या भीतीने पोलिसात तक्रार देण्यास घाबरत असल्याचेही पालकांकडून सांगण्यात आले. मारहाणीचे व्रण विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शरीरावर उमटले आहेत. यशराज अनिल ढिकले असे बेदम मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. यासह सहा ते सात विद्यार्थ्यांना मारण्यात आले असल्याचेही विद्यार्थ्यांने सांगितले. या पूर्वीसुद्धा या शाळेच्या विरोधात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे आता तरी मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापक (Headmaster) महिलेवर कारवाई होणार का असा प्रश्न पालक विचारत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! भरधाव दुचाकीची एसटी बसला धडक, ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत दाखल

World Physiotherapy Day : बाळंतपणानंतर पाठदुखी, कमजोरी आणि डिप्रेशनमुळे त्रस्त आहात? मग फिजिओथेरपी ठरेल सगळ्यात बेस्ट ऑपशन

बुलेट ट्रेनचं काम सुसाट! मुंबईतील महत्वाचा टप्पा पार केला, पाहा VIDEO

Mira Bhayndar : एकाच कुटुंबातील ६ जणांना विषबाधा; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT