nashik rain today live Saam TV
महाराष्ट्र

Nashik Rain News: मुसळधार पावसाने नाशिकला झोडपलं; गोदावरी नदीला महापूर, अनेक मंदिरं पाण्याखाली

Nashik Rain Today Live: गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे.

Satish Daud

Nashik Rain News Today: ऑगस्ट महिन्यात दडी मारणाऱ्या पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून गेल्या २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. (Latest Marathi News)

यंदाच्या हंगामातील गोदावरी नदीला (Godavari River) आलेला हा पहिलाच पूर आहे. पुराच्या पाण्यामुळे रामकुंड परिसरातील अनेक मंदिर पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकच्या चणकापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.

त्यामुळे गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे नदीवरील छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. तर चणकापूर धरणाखालील अंठबे पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने कळवण, वणीकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. पावसाचा जोर सुरू राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. (Breaking Marathi News)

दुसरीकडे मालेगाव शहरातून महामार्गाकडे जाणाऱ्या टेहरे पूलाला पाणी लागल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मालेगाव ते टेहरे चौफुली हा रस्ता मध्यरात्रीपासून वाहतूकीसाठी बंद केला आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यातून वाहने नेण्याचे धाडस करू नये, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यासाठी देण्यात आलेला यलो अलर्ट आणखी दोन दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचे असणार असून शुक्रवार जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला होता. शनिवार आणि रविवारी देखील हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार दिवस हे पावसाचे राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT