Nashik Purse Snatching News
Nashik Purse Snatching News तबरेज शेख, नाशिक
महाराष्ट्र

Nashik Crime: नाशकात वृद्धांची सुरक्षा वाऱ्यावर! चोरट्यानं भरस्त्यात ६२ वर्षीय आजींची पर्स पळवली, पाहा Video

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख, नाशिक

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील चोरट्यांना पोलिसांचे भय राहिलेले नाही. नाशिकमध्ये (Nashik) भर दिवसा एका ६२ वर्षीय आजींची पर्स एका चोरट्यानं (Thief) हिसकावली आहे. आपली पर्स वाचवण्यासाठी या आजींनी चोरट्याशी झटापटही केली, मात्र चोरट्याने पर्स हिसकावत पोबारा केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून नाशिकमधील गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले आहे की नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (Nashik Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मखमलाबाद रोडवर ही घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास या ६२ वर्षीय आजी रस्त्याने चालत जात होत्या. आजू-बाजूला वर्दळ नसल्याचे पाहून एक चोरटा मागून आला आणि त्याने अचानक या आजींच्या हातातील पर्स हिसकावली. यावेळी आजींसोबत चोराने बरीच झटापट केली. त्यानंतर चोरट्याने मोबाईल आणि रोख रक्कम असा पर्समधील जवळपास १४ हजारांचा मुद्देमाल दिवसा-ढवळ्या लंपास केला आहे.

पाहा व्हिडिओ -

ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे नाशिकमध्ये वयोवृद्ध महिला असुरक्षित असल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

SCROLL FOR NEXT