nashik Crime news Saam tv
महाराष्ट्र

Nashik Shocking : आईचा त्रास बघवला नाही...; महिला पोलिसाच्या मुलीनं आयुष्य संपवलं

nashik Crime news : नाशिकमध्ये महिला पोलिसाच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. २० वर्षीय मुलीने आयुष्य संपवल्याने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

नाशिक : नाशिकमध्ये २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आईचा त्रास न बघवल्याने तरुणीने धक्कादायक पाऊल उचललं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत तरुणीने आत्महत्येचे कारण सांगितलं. तरुणीच्या टोकाच्या निर्णयाने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आई शिक्षणाचा त्रास नको घेऊ, असं शेवटच्या चिठ्ठीत लिहत 20 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. आईला चिठ्ठी लिहिल्यानंतर गळफास महिला पोलिसाच्या मुलीने आत्महत्या केली. पूजा दीपक डांबरे असे तरुणीचे नाव आहे.

पूजा आणि तिची आई ही बिडी कामगारनगर अमृतधाम येथे राहत होत्या. पूजा नुकतीच बारावी पास होऊन तिने प्रथम वर्षासाठी महाविद्यालयीन शिक्षण सुरू केले होते. पूजाचे वडील विभक्त राहत असल्याने मायलेकी सोबत राहत होत्या.

आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीची आई ही पोलिस अंमलदार आहे. 'आई तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च फार आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. तुझी धावपळ होते, असे चिठ्ठीत लिहित तरुणीने आयुष्य संपवलं. तरुणीच्या आत्महत्येने पोलीस वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.

बारामतीत बँक मॅनेजरची आत्महत्या

बारामतीमध्ये अतिरिक्त कामाच्या दबावाला कंटाळून बँक मॅनेजरनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बारामती शहरातील भिगवण परिसरात ही घटना घडली. शिवशंकर मित्रा असे बँक मॅनेजरचे नाव आहे. शिवशंकर हे बँक ऑफ बडोदामध्ये मुख्य प्रबंधक या पदावर कार्यरत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT