Nashik Onion Market Latest News: केंद्रातील मोदी सरकारने देशातील कांदा निर्यातीवर ४० टक्क्यांचा कर लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कांदा निर्यातीवर जबर कर लावण्यात आल्याने कांद्याचे दर खाली कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळं राज्यातील विरोधक तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात येत आहे. (Latest Marathi News)
नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव (Onion Market) सलग तिसऱ्या दिवशी देखील बंद ठेवण्यात आला आहे. निर्यात मुल्य हटवण्याची तसंच सीमेवर आणि बंदरात अडकलेल्या कांद्याची निर्यात होत नाही, तोपर्यंत कांदा लिलाव सुरू करणार नाही, अशी भूमिका कांदा व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
विशेष बाब म्हणजे, कांदा विक्रीचा लिलाव सुरू न केल्यास व्यापाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारकडून देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाच्या इशाऱ्यानंतरही कांदा व्यापारी लिलाव बंद ठेवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.
व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळे कांद्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनी आज कांदा लिलाव सुरू न केल्यास बाजार समिती कारवाईच्या नोटीसा बजावणार, तसेच परवाने रद्द करणार, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
एकट्या लासलगाव बाजार समितीमधील ४० कांदा व्यापाऱ्यांना परवाने रद्द करण्याच्या नोटीसा बजावणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे कांद्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी बैठक बोलवली आहे. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात भारती पवार यांची बैठक होणार आहे.
जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकारी, कांदा व्यापारी तसच नाफेडचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहे. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या भूमिकेवरही तोडगा काढण्याचा काय प्रयत्न होणार, याकडेच सर्वांच लक्ष लागून आहे. दरम्यान, नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी कांदा विक्री तसेच कांद्याची लिलाव प्रक्रिया बंद पाडल्यामुळे दररोज होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली झाल्याची माहिती आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.