nashik, kanda, onion, lasalgoan bazar samiti saam tv
महाराष्ट्र

Nashik Onion Traders Strike: नाशकात काेट्यवधींची कांद्याची उलाढाल ठप्प! लासलगाव पाठोपाठ नांदगावातील व्यापाऱ्यांना नोटीसा

Nashik Latest News: लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समिती प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

Gangappa Pujari

अभिजीत सोनवणे, प्रतिनिधी

Nashik Onion Auction:

नाशिक जिल्ह्यातील सुमारे १५ बाजार समित्यांमधील कांदा लिलाव गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. लिलाव बंद झाल्याने कोट्यवधींचे नुकसान होत असून शेतकरीही अडचणीत आला आहे. दरम्यान लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर आज लासलगाव बाजार समिती प्रशासन कारवाईचा बडगा उगारला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कांदा खरेदीदार व्यापा-यांनी बुधवापासून (ता. २० सप्टेंबर) कांदा लिलाव बेमुदत बंद ( nashik onion auction) ठेवला आहे. दोन दिवस उलटून गेले तरी बंदच्या भूमिकेवर कांदा व्यापारी असोसिएशन ठाम राहिले आहे. व्यापाऱ्यांच्या विरोधात आता लासलगाव बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

काल लासलगाव बाजार समितीच्या ५४२ व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या, त्यानंतर आता लासलगाव पाठोपाठ नांदगाव बाजार समितीकडून कांदा व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

नांदगाव बाजार समितीतील६५ व्यापाऱ्यांना बाजार समिती प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आले आहेत. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार कांदा लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांना या नोटीसा देण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित अथवा रद्द का करण्यात येऊ नयेत? अशा आशयाच्या कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT