Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : शेततळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू; अंघोळीसाठी गेले असताना घडली घटना

Nashik News : आई- वडील काम करत असताना शेतातील विहिरींची मोटार सुरु केली. यानंतर दोघे भाऊ शेततळ्यात अंघोळ करण्यासाठी गेले

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करून शेततळ्यावर आंघोळीसाठी गेलेल्या दोघे सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारच्या सुमारास घडली. दोन्ही मुलांचे मृतदेह पाहून आईने एकच आक्रोश केला. 

नाशिकच्या (Nashik) निफाड येथील नांदुर्डी रोडवर असलेल्या ढेपले वस्तीवर हि घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत प्रेम ढेपले आणि प्रतीक ढेपले या दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. प्रेम व प्रतीक हे आई वडिलांसह ढेपले वस्तीवर वास्तव्यास होते. आई- वडील काम करत असताना शेतातील विहिरींची मोटार सुरु केली. यानंतर दोघे भाऊ शेततळ्यात अंघोळ करण्यासाठी गेले. मात्र शेततळ्यातील पाण्याची खोली अधिक असल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही. यात त्यांचा मृत्यू (Death) झाला. 

दोघा भावांचा बुडाल्याची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. यानंतर दोघांनाही बाहेर काढण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला होता. दोन्ही मुलांचा मृतदेह पाहून आईने एकच आक्रोश केला. तर सदर घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयात बैठकीला सुरुवात

MHADA Lottery : ठाणे, कल्याणमध्ये फक्त २० लाखांत घर, दिवाळीआधी म्हाडाची १००० घरांची लॉटरी निघणार

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

SCROLL FOR NEXT