Nashik Sinner Fata Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik News : लोखंडी रॉडने वार करत तरुणाला भररस्त्यातच संपवलं; नाशिकमधील हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Nashik Sinner Fata Crime News : अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर फाटा परिसरात घडली. तरुणावर झालेल्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

Satish Daud

अभिजित सोनावणे, साम टीव्ही

जुन्या वादातून एका तरुणावर भरदिवसा लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर फाटा परिसरात घडली. तरुणावर झालेल्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

प्रमोद वाघ असं मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद वाघ हा शुक्रवारी सिन्नर फाटा परिसरात असलेल्या एका दुकानासमोर उभा होता. यावेळी त्याचा अन्य दोन व्यक्तींसोबत वाद झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की, यातील एका तरुणाने प्रमोदच्या डोक्यात लोखंडी रॉडने वारंवार हल्ला (Crime News) केला. या हल्लात प्रमोदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या प्रमोदला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच प्रमोदचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात विविध कलमाअंतर्गत गु्न्हा दाखल केलाय. सध्या आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio VS Airtel: ₹२९९ प्रीपेड प्लॅनमध्ये जास्त डेटा कोण देईल, जिओ की एअरटेल?

8 November 2025 Horoscope: आज द्विग्रह योग होणार, मेष आणि मिथुन राशींसाठी असेल शुभ काळ

Pune News : पुण्यात शासनाची फसवणूक, ४६ बोगस दिव्यांग शिक्षकांची नावं समोर; कारवाईची टांगती तलवार

Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट, जळगावात तापमान १२.६ अंशांवर; इतर ठिकाणी काय स्थिती? | पाहा VIDEO

Mumbai Local: नवी मुंबईत धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू, तोल गेला अन् रूळावर पडला

SCROLL FOR NEXT