Nashik Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Nashik Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्यात सलग १२ दिवसांपासून अवकाळीचा कहर; साडेपाच हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान

Nashik News : जिल्ह्यात अजूनही दररोज अवकाळी पाऊस कहर करत असल्याने नुकसानीचा आकडा वाढू शकतो. सर्वाधिक फटका कांदा, भाजीपाला व आंबा पिकाला बसला आहे साडेपाच हजार हेक्टरवरील पिकांची माती

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : राज्यात मे महिन्याच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे. अजूनपर्यंत पाऊस सुरु असून पुढील काही दिवसात देखील अवकाळीचा शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात मागील बारा दिवस सलगपणे अवकाळी पाऊस सुरु असून अनेक वर्षांनंतर मे महिन्यात इतका पाऊस झाल्याने शेती पिकांना फटका बसला आहे. तर जिल्ह्यात साधारण साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात मागील बारा दिवसात थैमान घातले आहे. यामुळे तब्बल साडेपाच हजार हेक्टरवरील पिकांची माती झाली असून अनेक वर्षांनंतर मे महिन्यात पिकांना अवकाळीचा इतका मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात अजूनही दररोज अवकाळी पाऊस कहर करत असल्याने नुकसानीचा आकडा वाढू शकतो. सर्वाधिक फटका कांदा, भाजीपाला व आंबा पिकाला बसला आहे. तर, द्राक्षाचे देखील नुकसान झाले आहे. मात्र अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्यानं नुकसानग्रस्त पिकांचा आकडा रोजच वाढत आहे.

विजाच्या कडकडाटाने दोन हजार कोंबड्यांचा मृत्यू  

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील शेतकरी नाना मोरे यांच्या पोल्ट्रीफॉर्म मधील दोन हजार कोंबड्या रात्रीच्या विजाच्या कडकडाच्या आवाजाने मरण पावल्या आहेत. त्यामुळे मोरे यांचे लाखोचे नुकसान झाले. या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करावे; अशी मागणी शेतकरी मोरे यांनी केली आहे.

पावसाने पांझन नदी वाहू लागली
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मनमाड व बाजूच्या परिसरात मध्यरात्रीपासून विजांचा प्रचंड गडगडटासह जोरदार पाऊस झाल्याने पांझन नदी जोरदार वाहू लागली आहे. तर काल संध्याकाळच्या सुमारास येवला तालुक्यातील जळगाव- नेउर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले, ते थेट शेतातील विहिरीच्या कठड्याला लागल्याने विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

SCROLL FOR NEXT