Manmad Ankai Fort Todays News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News : एकाला वाचवायला गेला अन् दुसराही बुडाला; नाशिकमध्ये हृदय हेलावणारी घटना

मिलींद रविंद्र जाधव आणि रोहित राठोड अशी तलावात बुडालेल्या मित्रांची नावे आहेत.

अभिजित सोनावणे

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास एक थरारक घटना घडली. मनमाड (Manmad) जवळच्या अंकाई किल्ल्यावरील तलावात दोन तरुण बुडाले. दोन्ही तरुण किल्ल्यावरील अगस्तीमुनीच्या दर्शनाला आले होते. किल्ला फिरून झाल्यानंतर ते तलावात अंघोळीसाठी उतरले. दरम्यान, तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. (Nashik Manmad Todays News)

नेमकं काय घडलं?

सध्या राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे पर्यटनस्थळावर फिरण्यासाठी नागरिक गर्दी करताहेत. मनमाड जवळच्या अंकाई किल्ल्यावरही शेकडो नागरिक येत असतात. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव परिसरातील दोन मित्र, मिलींद रविंद्र जाधव आणि रोहित राठोड हे अंकाई किल्ल्यावरील अगस्तीमुनीच्या दर्शनाला आले होते.

किल्ला फिरून झाल्यानंतर दोघेही अंघोळीसाठी तलावातील पाण्यात उतरले. त्यातील एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. आपला मित्र बुडत असल्याचं बघून दुसऱ्याने तातडीने त्याच्याकडे धाव घेतली. मात्र, त्याला वाचवण्याचा नांदात दुसराही मित्र बुडाला. (Manmad Ankai Fort Todays News)

दरम्यान, किल्ल्यावरील काही जणांना याची माहिती मिळताच त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अंकाई गावातील नागरिकांना तातडीने याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. मित्राला वाचवण्याचा नांदात दुसऱ्याचाही मित्राचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्यायम नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT