Nashik Crime News, Nashik Latest Marathi News
Nashik Crime News, Nashik Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik: घरफोडीच्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक; 25 गुन्ह्यांपैकी14 गुन्हे उघडकीस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज  शेख

नाशिक - मूर्ती लहान पण, किर्ती महान या म्हणीचा प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. अंबड पाेलिसांनी (Police) अटक केलेल्या तीनपैकी एका चोरट्याचे वय पाहता त्याच्यावर वयापेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे समाेर आले आहे. दरम्यान, तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर दाखल 25 गुन्ह्यांपैकी अंबड व सातपूर (Satpur) येथील 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. (Nashik Latest Marathi News)

नाशिकच्या अंबड पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात असलेल्या तिन्ही आरोपींना अटक केली असून सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौदा घरफोड्यांचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

हे देखील पाहा -

या गुन्ह्यांत त्यांच्याकडून 28 ताेळे साेने, वाहने, लॅपटाॅप व इतर साहित्य असा 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अभिषेक विश्वकर्मा, करण कडुस्कर आणि ऋषिकेश राजगिरेअसे अटकेतील आरोपींची गुन्हेगारांची नावे आहेत. विशेष म्हणजे मुख्य सूत्रधार अभिषेकवर 19 गुन्हे तर करणवर 21 आणि ऋषिकेशवर 24 गुन्हे दाखल आहेत. अटकेतील आरोपींनी सन 2020 व 21 मध्ये उस्मानाबाद, बेंबळी, गंगाखेड व लासलगाव येथे घरफाेडी व चाेरीचे गुन्हे केले असून 25 पैकी 11 गुन्ह्यांत पोलीस या तिघांचा शोध घेत होते.

2017 पासून हे तिघेही अंबड परिसरातील चुंचाळे येथे वास्तव्यास हाेते. उस्मानाबाद, परभणी येथील गंभीर गुन्ह्यात 3 वर्षापासून फरार असताना शहरात वास्तव्य करुन अंबडला 14 घरफोडी, चोरी, लूट आणि खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या तिघांच्या व्यतिरिक्त त्यांच्या सहा साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून त्यांना अटक करण्यासाठी पथक काम करत आहे.

हे तिघेही अंबड हद्दीत बंद घरांची रेकी करून घरफोडी करत होते. अंबड पाेलिस एका घरफाेडीचा तपास करत असताना त्यांनी सीसीटीव्ही फूटेजनुसार एकाची आेळख पटली. पाेलिसांनी यात टेक्निकल आधारावर जादा भर न देता खबऱ्यांचे जाळे पसरविले. त्यानुसार त्यांच्यामार्फतीने या तिघांच्या गुन्ह्यांचा भांडाफाेड झाला. त्यात करणला चुंचाळेतून, अभिषेकला पुण्यातून तर ऋषिकेशला पेठमधून अटक करण्यात आली.

अंबड, गंगाखेड, उस्मानाबाद शहर, बेंबळी व इंदिरानगर व अन्य पाेलिस ठाण्यात दाखल असलेल्या 11 गुन्ह्यांत हे संशयित वाॅन्टेड आहेत. तीन वर्षांपासून ते पाेलिसांनी हवे हाेते. त्यांच्यावर खुनासह चेनस्नॅचिंग, प्राणघातक हल्ला, लुटमार, दराेडा चाेरी, घरफाेडीचे गुन्हे दाखल आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT