Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : बँकेचे लॉकर तोडून दोन वेळा चोरी; संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात

Nashik News : २०२३ साली अमितकुमार प्रसाद याने एमआयडीसी परिसरात असलेल्या इंडियन बँकमध्ये छत तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या एमआयडीसी मध्ये दोन वेळा सिनेस्टाईल बँकेत प्रवेश करून स्ट्रॉंग रूम (लॉकर) फोडून चोरी केली होती. या चोरी करणाऱ्या संशयिताला एमआयडीसी गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी संशयीताकडून एक लाख ६० हजार रुपयाचा मुद्दामाल हस्तगत करण्यात आला आहे.

अमितकुमार प्रसाद असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. २०२३ साली अमितकुमार प्रसाद याने एमआयडीसी परिसरात (Nashik) असलेल्या इंडियन बँकमध्ये छत तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता १९ जुलैला त्याने पुन्हा एकदा त्याच बँकेच्या छताला भगदाड पाडून बँकेत सिनेस्टाईल प्रवेश करत कटर वापरून लॉकर फोडून चोरी केली होती. या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. बँकेत (Theft) चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती.  

७ गुन्ह्यांची कबुली 

पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे या संशयीताचा शोध सुरु केला होता. त्याला (Ambad) अंबड परिसरातील अंबडगाव येथून अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने आणखीन सात गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यात चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरी अशाचे गुन्हे त्यावर दाखल आहे. या संशयीताला पकडल्यामुळे ७ गुन्हे उघडकीस आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : महाराष्ट्रासाठी ४ दिवस महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळीचा अंदाज, IMD कडून या ठिकाणी 'यलो अलर्ट

Dhurandhar 2: 'धुरंधर २' मधील पात्रांची रिअल लाइफ झलक; दोन वर्षांच्या शोधानंतर मिळाली परफेक्ट कास्टिंग

Ashwini Bhide: मुंबईला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त, कोण आहेत IAS अश्विनी भिडे?

दिल्लीहून शिर्डीकडे येणारे विमान भरकटलं; हवेतच घिरट्या, नागरिकांची धावपळ|VIDEO

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्यात वादळीवारा आणि गारपीट; कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान

SCROLL FOR NEXT