Advay Hire Saam Tv
महाराष्ट्र

Advay Hire: विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला दिलासा, नाशिकचे उपनेते अद्वय हिरेंना अखेर जामीन

Advay Hire Granted Bail: नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मालेगाव आणि रेणुका देवी सोसायटीची कोट्यवधींचे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अद्वय हिरे अटकेत होते.

Priya More

रेणुका सुत गिरणीसाठी घेतलेल्या कर्ज प्रकरणात जिल्हा बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना अखेर दिसाला मिळाला. अद्वय हिरे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मालेगाव आणि रेणुका देवी सोसायटीची कोट्यवधींचे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ते अटकेत होते. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून ते तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

नाशिकचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्या जवळच्या १० नातेवाईकांनी मिळून जवळपास ७ कोटी रुपयांची जमीन बँकेला तारण ठेवली होती. कर्ज प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार बँकेने केल्यानंतर अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात १५ नोव्हेंबर २०२३ ला अद्वय हिरे यांना अटक करण्यात आली होती. नाशिकच्या मध्यवर्ती तुरुंगामध्ये त्यांना ठेवण्यात आले होते.

जिल्हा बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अद्वय हिरे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. गेल्या ९ महिन्यांपासून ते नाशिकच्या मध्यवर्ती तुरुंगात आहेत. जामीन मिळवण्यासाठी अद्वय हिरे यांनी बरेच प्रयत्न केले. पण मालेगाव न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. अखेर ९ महिन्यांनंतर अद्वय हिरे कारागृहातून बाहेर येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT