Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : येवला तालुक्यातील कोळगाव येथे दरोडा; दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कोळगाव येथे हा प्रकार घडला आहे. गावात चोरीच्या उद्देशाने आलेल्या काही अज्ञात चोरट्यांनी गाडेकर वस्तीवर दरोडा टाकत जबरी चोरी

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या येवला तालुक्यातील कोळगाव येथे आज मध्यरात्रीच्या सुमारास गाडेकर वस्तीवर दरोडा टाकला. मात्र दरोडेखोरांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी परिसरातील एकाने दरोडेखोरांना प्रतिकार केला. मात्र दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. शिवाय त्यांच्याकडील काही रक्कम देखील घेऊन गेले आहेत. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कोळगाव येथे हा प्रकार घडला आहे. गावात चोरीच्या उद्देशाने आलेल्या काही अज्ञात चोरट्यांनी गाडेकर वस्तीवर दरोडा टाकत जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रतिकार करणाऱ्या कारभारी आनंद गाडेकर (वय ७५) यांच्या मानेला सुरी लावून चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील (Crime News) पैशाचे पाकीट ओरबडून नेले. यावेळी प्रतिकार करणाऱ्या वृध्द कारभारी गाडेकरांना दरोडेखोरांनी जबर मारहाण करून त्यांच्या मानेला हातापायाला गंभीर जखमा केल्या आहेत. सध्या त्यांच्यावर येवल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे,

पोलिसांकडून तपास सुरु 

काळेगाव गावात घडलेल्या या घटनेबाबतची माहिती येवला तालुका (Police) पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेबाबत अधिक माहिती घेतली. यानंतर तात्काळ नाकेबंदी सुरू केली असून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT