Nandurbar News : नंदुरबारला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक्र धरणाची पाणी पातळीत चार मीटरने वाढ

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात मागील तीन- चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे नदी- नाल्यांना पाणी आले आहे. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणी साठ्यात देखील वाढ होत
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार तालुका आणि शहर परिसरात दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे समाधान व्यक्त केले जात असून नदी नाले प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक्र धरणात पाणीसाठा चार मीटरने वाढला असून धरण्यात आता २९ टक्के पाणीसाठा झाला आहे.  

Nandurbar News
Rain Alert Maharashtra : राज्यातील 15 जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा; वाचा कुठे कुठे पडणार पाऊस

नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यात मागील तीन- चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे नदी- नाल्यांना पाणी आले आहे. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणी साठ्यात देखील वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दमदार पावसामुळे (Rain) नदी नाले प्रवाहित झाल्याने धरणातील पाणीसाठा आणखीन लवकरच वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे दमदार पावसाने हजेरी लावल्याने विहिरी आणि बोरवेलच्याही पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Nandurbar News
Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, मेष राशीच्या लोकांची होणार प्रगती, तर कर्क राशीला धनलाभ शक्यता; तुमची रास?

नंदुरबारचा पाणी प्रश्न मिटला 

नंदुरबार शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. शहरात सध्या पाच दिवसांआड पाणी पुरवठा केला जात होता. मात्र शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक्र धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. यामुळे शहरातील पाणी [प्रश्न आता मिटणार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com