Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: तलवार घेवून रिल्‍सचा व्हिडिओ सोशल मीडियावर; तरूणाला चांगलेच पडले महागात

तलवार घेवून रिल्‍सचा व्हिडिओ सोशल मीडियावर; तरूणाला चांगलेच पडले महागात

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : सोशल मिडीयावर रिल्स बनवणे नाशिकमध्ये एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. हातात तलवार घेवून चित्रपटातील गितावर रिल्‍स तयार केले. हा व्‍हीडीओ व्‍हायरल झाल्‍यानंतर (Police) पोलिसांपर्यंत पोहचला. यानंतर संबंधीत युवकाला पोलिसांनी ताब्‍यात घेतले. (Tajya Batmya)

सोशल मिडीयाचे भूत डोक्यावर चढलेल्या नाशिकमधील एका तरुणाने हातात तलवार घेऊन हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर रिल्स बनवले. हा व्हिडिओ नाशिकच्या गुन्हे शाखेच्या हाती लागला. मग काय सोशल मिडीयावर तलवार घेऊन रिल्स बनवणाऱ्या त्या तरुणाचे सोशल मीडियाचे डोक्यावर चढलेले भूत पोलीसांनी उतरवले.

पोलिसांनी घेतला शोध

भारत नगर येथे राहणारा १९ वर्षीय संशयित फैजान नईम शेख याने हातात तलवार घेऊन त्याचा रिल्स बनवत हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) अपलोड केला. व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी माहिती काढत भारतनगर इथे राहणाऱ्या फैजान शेखचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेत त्याकडून एक तलवार हस्तगत केली.

अन्‍य दुसराही ताब्‍यात

तलवारबाबत अधिक चौकशी केली असता त्याने ही तलवार भारतनगर येथेच राहणारा संशयित सचिन शरद इंगोले याच्याकडून घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी सचिन इंगोले याला देखील ताब्यात घेत त्याकडून एक गुप्ती जप्त केली असल्याची माहिती नाशिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Woman Harassment : समृद्धी महामार्गावर भीतीचे सावट! पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने महिलेची काढली छेड

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

Diwali Swapna Shastra: दिवाळीत जर 'ही' 3 स्वप्न दिसली तर समजा तुम्ही होणार श्रीमंत; देवी लक्ष्मी देत असते संकेत

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? केंद्र सरकारची माहिती

हर्बल हुक्का बार चालवायला परवानगी, कोर्टाने महाराष्ट्र पोलिसाला खडसावले, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT