Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : तर लोकप्रतिनिधींनी आता मत मागायला येऊ नये; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फलक लावून विरोध

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : कांदा निर्यात बंदी असल्याने चांगला दर मिळत नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. (Nashik) यात आता लोकसभा निवडणूक कार्यक्रम (Lok Sabha Election) जाहीर झाल्यानंतर आर्थिक विवंचनेत असलेल्या देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतसह सर्व कांदा उत्पादक शेतकरी (Farmer) एकत्र येत तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार, सत्ताधारी- विरोधक लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये आशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे. (Live Marathi News)

शेतकरी गेल्या अनेक दशकांपासून आर्थिक झळा सोसत आहे. कांदा (Onion) पीक घेण्यासाठी पूरक घटकांच्या किंमतीत १० पट वाढ झाली आहे. त्या प्रमाणात कांदा दर कधीही मिळत नाही. उलट मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी देशाचे लक्ष कांद्यावर केंद्रित केले जाते आणि इतर वाढत असलेली महागाई दुर्लक्षित केली जाते. कांदा शेती करण्यासाठी लागणार खर्च बघता त्या प्रमाणात कांद्याला दर मिळत नाही. म्हणून गेल्या वर्षी मार्च महिन्यात संपूर्ण गाव विकायला काढले होते. त्यावेळी माळवाडी येथे व्यथित शेतकऱ्यांना भेटायला कोणीही सत्ताधारी अथवा विरोधकही आले नाहीत. म्हणून आज मत मागायला येऊ नका असे म्हणणे कांदा उत्पादक शेतकरी यांनी ठरवले आहे. आता आम्ही ठरवू कोणाला मत द्यायचे. असे मत अविनाश बागुल यांनी मांडले. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फलक लावत घोषणाबाजी 

कांदा उत्पादक नाशिकच्या कसमादे पट्ट्यात शेतकरी कांदा प्रश्नावरुन आजही आक्रमक असून नाशिकच्या देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आक्रमक भूमिका घेत तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार. सत्ताधारी व विरोधकांनी कांदा प्रश्नावर मुग गिळून बसले असल्याने कोणीही मत मागायला येऊ नये; कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक भुर्दंड सोसत आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी अशा आशयाचे फलक लावत घोषणा देत आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT