Onion Price Saam tv
महाराष्ट्र

Onion Price : कांद्याला तीन हजार रुपयांचा दर मिळावा; ग्रामसभेत एकमताने ठराव

Nashik News : कांद्याच्या दरात वाढ होण्याची मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहे. अशाच प्रकार नाशिक जिल्ह्यातच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यानंतर आता थेट ग्रामसभेत ठराव करण्यात आला

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: कांद्याच्या दरात मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून कांद्याची दरवाढ व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हीच मागणी घेत नाशिक जिल्ह्यातील सोमठाणदेश ग्रामपंचायत मध्ये आयोजित ग्रामसभेत कांद्याला तीन हजार रुपये इतका दर मिळावा; असा ठराव करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांडा उत्पादन घेतले जात असते.

जिल्ह्यात मोठी बाजारपेठ असल्याने शेतकरी देखील कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करत असतो. मात्र शेतकऱ्यांचा कांदा काढणी सुरु झाल्यानंतर मार्केटमधील कांद्याच्या दारात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. कांद्याच्या दरात वाढ होण्याची मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहे. अशाच प्रकार नाशिक जिल्ह्यातच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तरी देखील कांद्याच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही.

ग्रामसभेत करण्यात आला ठराव 

नाशिकच्या येवला तालुक्यातील सोमठाणदेश येथे ग्रामपंचायती मध्ये ग्राम सभा घेण्यात आली. ग्रामसभेत आतापर्यंत स्वस्त दरात विक्री झालेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला १५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे व आता शेतकऱ्यांच्या चाळीतील कांद्याला किमान ३००० पेक्षा अधिकचा दर मिळावा; या मागण्यांचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष केदारनाथ नवले सर्व ग्रामस्थांच्या व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वरील ठराव बहुमताने ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

वातावरणामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रार्दुभाव
नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागिल महिन्यात नविन कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. मात्र गेल्या काही दिवसां पासून ढगाळ वातावरण व पहाटेच्या वेळी पडणारे पावसाळी धुके याचा परिणाम कांद्यावर दिसून येत आहे. कांद्यावर करपा, मावा रोगांचा प्रार्दुभाव दिसून येत असल्याने रोगापासून पिकाला वाचविण्यासाठी शेतक-यांना महागड्या औषधांचा वापर करण्याची वेळ आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Semiconductor Mission : बेंगळुरूमध्ये डिझाइन होणार जगातील सर्वात प्रगत 2nm चिप्स; एआरएमच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

Bachchu Kadu: शेतकऱ्यांसह बच्चू कडू गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले|VIDEO

Ashish Damle : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा; अजित पवार गटाच्या पारड्यात आणखी एक मंत्रिपद

Ashram School : वर्षभरापासून पोल्ट्री फार्ममध्ये भरतेय आश्रम शाळा; १२ कोटीची सुसज्ज शाळेची इमारत पडून

Beed–Ahilyanagar Train: बीड ते अहिल्यानगरच्या रेल्वेचं प्रवास भाडे किती? रेल्वे मार्गावर एकूण स्टेशन किती?

SCROLL FOR NEXT