Onion Auction Saam TV
महाराष्ट्र

Nashik Onion Auction: नाशिकमध्ये कांदा कोंडी कायम; ८ दिवसानंतर विंचुर उपबाजार समितीत लिलाव सुरू

Nashik Onion Market Strike: जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसापासून संप पुकारला आहे,

Gangappa Pujari

अजय सोनवणे, प्रतिनिधी

Nashik Onion Market:

नाशिक जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहेत. केंद्र सरकारने लागू केलेले कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क मागे घ्यावे आणि नाफेडचा कांदा घाऊक बाजारात विक्री करू नये, या मागणीसाठी 20 सप्टेंबरपासून नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने लिलाव बंदीचा निर्णय घेतला आहे. आज सातव्या दिवशी विंचूर उपबाजारात काही व्यापाऱ्यांच्या मदतीने लिलाव सुरू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसापासून संप पुकारला आहे. जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समितीचे कांदा लिलाव ठप्प झाल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

पियुष गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत 29 तारखेला व्यापाऱ्यांच्या मागण्यांसाठी बैठक होणार आहे. या संपामुळे शेतकऱ्यांची होणारी कोंडी लक्षात घेता लासलगावच्या विंचूर येथील उपबजार समितीने गणेश विसर्जनाच्या मुहूर्तावर कांदा लिलावला सुरुवात केली आहे.

दरम्यान, कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी मोठ्या संख्येने कांदा विक्रीला घेऊन आले होते. कांद्याला जास्तीत जास्त 2400 तर सरासरी 2000 ते 2100 रुपये भाव मिळाला. 8 दिवसांच्या कोंडीनंतर कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT