Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; माजी महापौर करणार ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकमधील प्रमुख पदाधिकारी व नाशिक महापालिकेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेला रामराम ठोकला आहे.

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बदल करण्याचे वारे सुरु आहेत. तर दुसरीकडे नेत्यांच्या प्रचार सभा होत आहेत. दरम्यान नाशिकमध्ये राज ठाकरे हे दौऱ्यावर येणार असून दौऱ्याआधीच नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील मनसेचा मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकमधील (Nashik News) प्रमुख पदाधिकारी व नाशिक महापालिकेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. नाशिकच्या विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक होते. मात्र याठिकाणी प्रसाद सानप यांना उमेदवारी देण्यात मुर्तडक हे नाराज होते. यामुळे त्यांनी पक्ष सोडून शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान त्यांच्या समर्थकांनी देखील पक्षाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. 

अडीच वर्ष होते महापौर 

अशोक मुर्तडक हे मनसेची (MNS) सत्ता असताना अडीच वर्ष महापौर होते. मनसेच्या काळात त्यांनी अनेक चांगली विकासाचे कामे केली होती. आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा असून या सभेमध्ये मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक हे प्रवेश करणार आहेत. अशोक मुर्तडक यांच्या प्रवेशाने नाशिक पूर्वची महाविकास आघाडीची ताकद वाढणार असून अशोक मुर्तडक हे महाराष्ट्र नव निर्माण सेनेत प्रदेश सरचिटणीस या पदावर होते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT