Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : धक्कादायक.. मुलांना विष देऊन विवाहितेची इमारतीवरून उडी; पती व सासरच्या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल

Nashik News : पती आणि सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अश्विनी निकुंभ या विवाहित महिलेने आपल्या मुली आराध्या आणि अगस्था यांना विष देऊन स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दोन लहान मुलीची हत्या करून इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (Nashik) नाशिकच्या आडगाव परिसरात घडली. विशेष म्हणजे आई आणि मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

अश्विनी निकुंभ असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. नाशिकच्या आडगाव परिसरात आज ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पती आणि सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अश्विनी निकुंभ या विवाहित महिलेने आपल्या मुली आराध्या आणि अगस्था यांना विष देऊन स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी (Police) व्यक्त केला आहे. परिसरातील नागरिकांनी घटना आडगाव पोलिसांना सांगितल्यानंतर आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली शेवटची इच्छा

अश्विनी आणि त्यांच्या मोठ्या मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी आपले पती स्वप्नील निकुंभ यांच्यासह त्याचा भाऊ तेजस आणि बहीण मयुरी सोमवंशी यांच्या नावाने सुसाईड नोट लिहून तसेच आपल्या मोबाईलमध्ये देखील याबाबत व्हिडिओ बनवला आहे. यात त्यांनी शेवटची इच्छा म्हणून मृतदेहास पतीला हात लावू न देता आई व भावाने अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आई आणि मुलीचा सुसाईड करण्यापूर्वीचा हृदय हलवणार व्हिडिओ साम टीव्हीच्या छाती लागला आहे. या घटनेबाबत अधिक तपास आडगाव पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : लोकलमध्ये दरवाजा उघडा ठेवण्यावरून वाद, २१ वर्षीय तरुणाची हत्या; मोठी अपडेट समोर

Sleep requirements by age: तुमचं वय किती आहे? जाणून घ्या तुम्ही दर दिवशी किती झोप घेतली पाहिजे?

Political News: केंद्रीय मंत्र्यांची प्रकृती बिघडली, तातडीने एम्स रुग्णालयात केलं दाखल

Monsoon Session 2026 : मोदी-शाह आले अन् संसद स्थगित, 19 दिवस संसद मात्र कामकाज शून्य

Maharashtra News Live Update: दिल्ली हायकोर्टाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी

SCROLL FOR NEXT