Nashik News Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : आमदार, मंत्री आणि खासदार यांना गावबंदी; नाशिक जिल्ह्यात दीडशेपेक्षा जास्त गावांचा निर्णय

Nashik News : आमदार, मंत्री आणि खासदार यांना गावबंदी; नाशिक जिल्ह्यात दीडशेपेक्षा जास्त गावांचा निर्णय

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील अनेक गावात (Maratha Reservation) राजकीय पुढारी, नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यानुसार (Nashik) नाशिक जिल्ह्यातील सुमारे १५० हुन अधिक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मराठा बांधव कुणबीचे आरक्षण (Maratha Aarkshan) काही शरद पवार, नारायण राणे आणि रामदास कदम यांच्या नातवांसाठी मागत नसून तो गरजवंत मराठा समाजासाठी मागत असल्याचं म्हणत नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला. मराठा आरक्षणासाठी साठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बळ देण्यासाठी आता लोकप्रतिनिधीना गावबंदी केली जातेय. नाशिक जिल्ह्यातील १५० हुन अधिक गावांनी गावबंदीचा निर्णय घेतला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेत्यांविरोधात घोषणाबाजी 

गावागावात गावबंदीचे फलक लावले जात असून आमदार, खासदार यांना गावात फिरू दिलं जाणार नाही. याशिवाय सकल मराठा समाज गावागावात जाऊन जनजागृती करत हे आंदोलन अधिक आक्रमक करणार आहे. यावेळी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मराठा नेत्यांच्याही विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng : भारताच्या ऐतिहासिक विजयात अडथळा, इंग्लंडच्या मदतीला पाऊस धावला; गिलसेना पराक्रम करणार का?

Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

SCROLL FOR NEXT