Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : पोलीस पत्नीच्या गणवेशाचा गैरवापर; गणवेश घालून पोलिस असल्याची बतावणी, पतीने अनेकाना गंडवले

Nashik News : तोतया पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून उपनिरीक्षक पत्नीचा वर्दीचा वापर करत या माध्यमातून अनेकांना गंडा घातला पोलीस पत्नीच्या गणवेशाचा वापर करून तो स्वतः उपनिरीक्षक असल्याचे भासवत होता

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिक पोलीस अधिकारी असलेल्या पत्नीच्या गणवेशाचा पतीने गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. पत्नीचा पोलीस गणवेश परिधान करून नाशिक शहरासह अनेक ठिकाणी फिरून पोलीस बतावणी करत पतीकडून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या या तोतया पोलिसाला अखेर नऊ महिन्यांनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 

नाशिक शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात सागर दिगंबर पवार असे संशयिताचे नाव असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली आहे. दरम्यान सागर पवार हा तोतया पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून उपनिरीक्षक पत्नीचा वर्दीचा वापर करत होता. या माध्यमातून त्याने अनेकांना गंडा घातला आहे. पोलीस पत्नीच्या गणवेशाचा वापर करून तो स्वतः उपनिरीक्षक असल्याचे भासवत होता. 

नऊ महिन्यांपासून होता फरार 

दरम्यान सागर पवार हा तोतया पोलीस बनून फिरत फसवणूक करत असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली. तेव्हापासून म्हणजे मागील नऊ महिन्यापासून सागर पवार हा फरार होता. अखेर नाशिक पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सापळा रचून पथकाने संशयित सागरला शिताफीने अटक केली आहे. 

असे आहेत कारनामे
सागर पवार याने पत्नीच्या पोलीस गणवेशाचा वापर केला. यातून पोलीस असल्याचे भासवत महिलांची फसवणूक केली आहे. तसेच पोलिसांत ओळख असल्याचे सांगून विविध ठिकाणी फिरायचा. प्रामुख्याने नोकरी, गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्याचे आमिष देत अनेकांना फसविले आहे. अर्थात पोलिसांच्या वर्दीचा आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचे समोर आले. या प्रकरणांमुळे सागर पवार याच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT