Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : कांद्याच्या गोडाऊनमध्ये शिरत बिबट्याचा हल्ला; दोन शेळ्या केल्या ठार

Nashik News : नाशिकच्या लासलगाव- विंचूर रोडवर असलेल्या दानिश खलील शेख यांचे कांद्याचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये कांदा साठवणूक केली असून रक्षणासाठी सुरक्षा रक्षक देखील ठेवला आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : वाडवस्तीमध्ये बिबट्याचा वावर मागील काही दिवसांपासून वाढला आहे. यातच लासलगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या आहेत. कांद्याच्या गोडाऊनमध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला, बिबट्याचा शेळ्यांवरील हल्ला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

नाशिकच्या (Nashik) लासलगाव- विंचूर रोडवर असलेल्या दानिश खलील शेख यांचे कांद्याचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये कांदा साठवणूक केली असून रक्षणासाठी सुरक्षा रक्षक देखील ठेवला आहे, दरम्यान या गोडाऊनमध्ये सुरक्षा रक्षकाने आपल्या दोन शेळ्या बांधलेल्या होत्या. या शेळ्यांवर रात्रीच्या सुमारास अचानक बिबट्याने (Leopard Attack) येत हल्ला केला. यात दोनही शेळ्या जागीच ठार झाल्या असून बिबट्याचा शेळ्यांवरील हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण 

सदर घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांसह या कांदा गोडाऊनवर कांदा प्रतवारी व पॅकिंग साठी येणाऱ्या कामगारांमध्ये ही भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला वनविभागाने पिंजरा लावत जेरबंद करावे; अशी मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT