Boycott Election Saam tv
महाराष्ट्र

Boycott Election : मेणबत्ती पेटवत मतदान न करण्याची घेतली शपथ; कळमदरी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

Nashik News : नांदगाव तालूक्यातील कळमदरी गावातील आदिवासी ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : लोकप्रदिनीधींना निवडून दिल्यानंतर देखील मागण्या पूर्ण होत नाही. हि परिस्थिती सर्वत्र पाहण्यास मिळते. या समस्या दूर करण्यासाठी (election) निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे काम अनेक गावात ग्रामस्थांनी केले आहे. अशाच प्रकारे (Nashik) नाशिक जिल्ह्यातील कळमदरीच्या ग्रामस्थांनी मेणबत्ती पेटवून मतदान न करण्याची शपथच घेतली आहे.  

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव (Nandgaon) तालूक्यातील कळमदरी गावातील आदिवासी ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ग्रामस्थांनी मेणबत्ती पेटवत कुठल्याही आमदार, खासदाराने मत मागण्यासाठी येऊ नये; अशी शपथ ग्रामस्थांनी घेतली. (Lok Sabha Election) कळमदरी हे दिंडोरी मतदार संघात येत असून यापूर्वी जामदरी येथिल आदिवासी नागरीकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

या आहेत समस्या 

२०२३ पासून पिक विमा मिळालेला नाही, कळमदरी गावातील जिल्हा परिषद नवीन इमारत मिळालेली नाही. कळमदरी ते गिरणा धरण रस्ता दुरुस्त झालेला नाही. चार महिन्यापासून आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले व रेशन कार्ड अजूनही मिळाले नाही; या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी बहिष्काराचे हत्यार उपसले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT