Farmer Success Story Saam tv
महाराष्ट्र

Farmer Success Story : आयटी इंजिनिअर तरुणाची कमाल; टरबूज, मिरची मिश्र शेतीतून लाखो रुपयांचा नफा

Nashik News : पारंपरिक शेती परवडत नाही. अर्थात निसर्गाचा लहरीपणा हे मुख्य कारण समोर येते. मात्र अनेकजण वेगळा प्रयोग करून शेतीतून चांगले उत्पादन घेण्याचे काम करत असतात कोटमगाव येथील अक्षय गणेश धांद्रे असे यशस्वी प्रयोग

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: पारंपरिक शेती करण्यासोबत जोड शेती धंदा करूनही शेती परवडत नसल्याची ओरड ऐकण्यास मिळते. मात्र कोटमगाव येथील आयटी इंजिनिअर तरुणाने शेतीमधील वेगळ्या प्रयोगातून कमाल करून दाखविली आहे. कंपनीचे वर्क फ्रॉम होम काम करत शेतीत टरबूज व मिरची असे मिश्र पीक घेण्याचा निर्णय घेतला. या मिश्र पद्धतीच्या शेतीतून लाखो रुपयांचा नफा हा तरुण शेतकरी मिळवत आहे. 

नाशिकच्या येवला तालुक्यातील कोटमगाव येथील अक्षय गणेश धांद्रे असे यशस्वी प्रयोग करणाऱ्या आयटी इंजिनिअर तरुणाचे नाव आहे. पारंपरिक शेती परवडत नाही. अर्थात निसर्गाचा लहरीपणा हे मुख्य कारण समोर येते. मात्र अनेकजण वेगळा प्रयोग करून शेतीतून चांगले उत्पादन घेण्याचे काम करत असतात. त्यानुसार कोटमगाव येथील अक्षय धांद्रे असे या आयटी इंजिनिअर तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. 

कंपनीच्या कामासोबत वडिलांना शेतीत मदत 

अक्षय धांद्रे हे बेंगलोर येथील एका कंपनीत आयटी इंजिनिअर असून नोकरीला असून सध्या ते वर्क फ्रॉम होम करत आहेत. कंपनीने ठरवून दिलेल्या वेळेत कंपनीचे घरूनच काम करत आहे. तर इतर वेळेत शेती करण्यावर अक्षय यांचा भर असतो. शेती हा व्यवसाय वडिलोपार्जित असून वडिलांना मदत म्हणून हा आयटी इंजिनिअर शेतकरी शेतीचे काम करत आहेत. त्यांनी शेतीत वेगळे काही करायचे; हे मनात ठरविले होते. 

लाखो रुपयांचा नफा 

त्यानुसार आपल्या एक एकर शेतीमध्ये टरबूज व मिरची या पिकाची मिश्र पीक पद्धतीने लागवड केली. यासाठी त्यांना एक लाख रुपयांचा खर्च आला असून टरबुजाच्या शेतीतून तब्बल ३५ टन एका एकरात उत्पन्न निघाले आहे. यातून शेतकऱ्याला साडेतीन लाख रुपयांचा नफा झाला आहे. तर यातच लागवड केलेल्या मिरचीचे उत्पादन देखील येणार आहे. आगामी मिरची विक्रीतून देखील या शेतकऱ्याला दोन लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT