Nashik Airport Saam tv
महाराष्ट्र

Nashik Airport : नाशिकहून आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा; १२ सप्टेंबरपासून उड्डाण

Nashik News : नाशिकच्या ओझर विमानतळावरून १२ सप्टेंबरपासून दिल्ली आणि बंगळुरू मार्गे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होत आहे.

अभिजित सोनावणे

नाशिक : नाशिकच्या विमानतळावरून देशांतर्गत सुरु असलेली विमान सेवा आता वाढणार आहे. देशांतर्गतच नाही तर आता हि विमानसेवा आंतरराष्ट्रीय विमानांचे देखील उड्डाण नाशिकच्या विमानतळावरून होणार आहे. पुढील महिन्यात अर्थात १२ सप्टेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण सुरु होणार आहे. हि विमानसेवा सुरु होत असल्याने नाशिकसाठी निश्चितच फायद्याची ठरणारी असेल. 

नाशिकच्या (Nashik) ओझर येथील विमानतळावरून आतापर्यंत देशातील प्रमुख शहरांसाठी विमानांचे उड्डाण होत होते. मात्र आता नाशिककरांसाठी आनंदाची बातमी असून १२ सप्टेंबरपासून (Airport) नाशिकहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा कनेक्टिंग होत आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून १२ सप्टेंबरपासून दिल्ली आणि बंगळुरू मार्गे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होत आहे. या ठिकाणाहून अबू धाबी, बँकॉक, न्यूयॉर्क, दुबई, लंडन, सिडनी, सिंगापुरसह अनेक देशात विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. 

उद्योग, पर्यटनाला चालना 

आंतरराष्टीय विमानसेवा सुरु होण्यासोबतच देशांतर्गत विमानसेवा देखील वाढणार आहे. यात सप्टेंबरपासून जम्मू, श्रीनगर, चंदीगड, अमृतसर, वाराणसी, जयपूरसह अनेक ठिकाणी विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. इंडिगो एअर लाईन कंपनीकडून नाशिकहून देशातील अनेक प्रमुख शहरात विमानसेवा सुरु केली जात आहे. नाशिकची हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याने आता नाशिकमधील उद्योग, पर्यटनासह अन्य क्षेत्रातील वाढीला चालना मिळणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

SCROLL FOR NEXT