Nashik Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Nashik Heavy Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस; सातपूर परिसरातील अनेक घरांमध्ये शिरले पाणी, त्र्यंबकेश्वरमधील रस्तेही पाण्याखाली

Nashik News : राज्यातील अनेक मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाला आहे. अनेक भागांमध्ये कालपासून जोरदार पाऊस होत असून आज सकाळी देखील मुसळधार पाऊस होत आहे. तर नाशिक शहरासह जिल्ह्याला आज मुसळधार पावसाने झोडपले

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिकमध्ये बुधवारी संध्याकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. आज सकाळी देखील नाशिक शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपुन काढले आहे. यामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी सातपूर परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

राज्यातील अनेक मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाला आहे. अनेक भागांमध्ये कालपासून जोरदार पाऊस होत असून आज सकाळी देखील मुसळधार पाऊस होत आहे. तर नाशिक शहरासह जिल्ह्याला आज मुसळधार पावसाने झोडपले आहे. या मुसळधार पावसाने त्र्यंबकेश्वर शहरातील रस्ते जलमय झाले असून त्र्यंबकेश्वर गावातील कुशावर्त, निवृत्तीनाथ महाराज मंदिर, बाळलेश्वर चौक या भागातील रस्त्यांवर पुराचं पाणी आले आहे. तर अनेक घर आणि वाड्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. 

सातपूर परिसरातील घरांमध्ये पाणी  

नाशिकच्या सातपूर परिसरात प्रभाग क्रमांक दहा मधील राधाकृष्ण नगरमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे पाणी ड्रेनेज लाईनमध्ये जात नाही; असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. पाण्याला ड्रेनेज लाईनमध्ये योग्य उतार न दिल्यामुळे परिसरात पाणी साचत आहे. महापालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पहावे आणि नागरिकांच्या घरात शिरत असलेले पाणी चेंबरमध्ये जाण्याची व्यवस्था पुन्हा करावी; अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

दारणा धरणातून पाणी सोडणार
नाशिक शहर व परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दुपारी तीन वाजेपासून दारणा धरणातून ११०० क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सोडणार आहे. दारणा धरण ५० टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. तर पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आयुष्यात 'या' लोकांशी शत्रुत्व महागात पडेल, कारण...

Priya Marathe: लाडक्या मैत्रीणीला शेवटाचा निरोप; अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला अश्रू अनावर, हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIDEO

Padwal Curry Recipe : गावाकडे बनवतात तशी झणझणीत पडवळ करी, वाचा पारंपरिक रेसिपी

Pandharpur Temple: विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसादाला बुरशी; पाकिटातून निघाल्या आळ्या

पोलीस इन्स्पेक्टरचा टोकाचा निर्णय; राहत्या खोलीत आयुष्य संपवलं; कुटुंबियांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT