Birth Certificate Scam Nashik Saam tv
महाराष्ट्र

Malegaon : बनावट जन्म दाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल; महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

Birth Certificate Scam Nashik: बांगलादेशी बोगस जन्म दाखला प्रकरणात महापालिकेच्या जन्म- मृत्यू नोंद विभागातुन देण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणात जन्म- मृत्यू नोंद विभागातील कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मालेगाव (नाशिक) : मालेगावमध्ये खोट्या व बनावट सह्या करून मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म दाखले देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असताना या प्रकरणात आता चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी मालेगाव महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांसह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे आढळून आले होते. याच्या चौकशीअंती बोगस जन्म प्रमाणपत्राच्या आधारे ते राहत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान बांगलादेशी बोगस जन्म दाखला प्रकरणात महापालिकेच्या जन्म- मृत्यू नोंद विभागातुन देण्यात आल्याचे समोर आले होते. यानंतर या प्रकरणात जन्म- मृत्यू नोंद विभागातील कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते. याची अजून चौकशी सुरूच आहे. 

चौथा गुन्हा दाखल 

नाशिकच्या मालेगावातील बहुचर्चित बनावट जन्म दाखला घोटाळा प्रकरणी मालेगाव किल्ला पोलिसात महापालिका प्रभाग चारचे प्रभाग अधिकारी फय्याज अहमद अब्दुल लतीफ, लिपिक वाल्मीक खरे व अर्जदार सिराज अहमद रहिमऊतुल्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे यात आणखी काही जणांचा समावेश असल्याची शक्यता देखील आहे. 

आतापर्यंत २५ जण ताब्यात 

या प्रकरणातील चौकशीत २६ जणांनी ७० वर्षांनंतर जन्मदाखल्यासाठी ११४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तर या प्रकरणात आतापर्यंत मालेगावात विविध पोलिस स्थानकात चार गुन्हे दाखल करून ५५ संशयितांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर २५ जण अटकेत आहे. यातील ५ जणांना जमीन मंजूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : सीएसएमटी स्थानकावर मराठ्यांची गर्दी, पाय ठेवायलाही जागा नाही

Uddhav Thackeray: संख्याबळ नाही तरी चमत्कार घडेल; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान|VIDEO

Instagram Earnings: कोणत्या देशातील Instagram क्रिएटर्स सर्वात जास्त कमाई करतात? जाणून घ्या

Local Train Viral Video: ठाणे-वाशी लोकलमध्ये तरूणाचं अश्लील कृत्य, महिलेला समजताच थोबाड फोडलं

Maharashtra Live News Update: नवी मुंबईत मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT