Nashik News  Saam tv
महाराष्ट्र

Nashik : वाटेत अंघोळ केल्यावर चक्कर येऊन कोसळले; देवीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकाचा मृत्यू

Nashik News : चैत्र उत्सवासाठी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात आहेत. तीव्र उन्हात देखील अनेक भाविक पायी दिंडी करत दर्शनासाठी जात आहेत. कैलास सोनवणे हे देखील गडावर जाण्यासाठी सांगवी (ता. शिरपूर) येथून पायी निघाले

Rajesh Sonwane

अजय सोनवणे
नाशिक
: चैत्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गडावर जात आहेत. यात हजारो भाविक पायी प्रवास करत जात दर्शनासाठी जात आहेत. अशाच प्रकारे पायी प्रवासा करत जाणाऱ्या एका वृद्ध भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. भाविकाने शेतात अंघोळ केल्यानंतर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

नाशिकच्या देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे गुरुवारी घडली. धुळे जिल्ह्यातील सांगवी येथील कैलास बुधा सोनवणे (वय ६०) असे मृत झालेल्या भाविकाचे नाव आहे. दरम्यान चैत्र उत्सवासाठी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात आहेत. तीव्र उन्हात देखील अनेक भाविक पायी दिंडी करत दर्शनासाठी जात आहेत. अशाच प्रकारे कैलास सोनवणे हे देखील पायी गडावर जाण्यासाठी सांगवी (ता. शिरपूर) येथून निघाले होते.  

पाणी पाहून अंघोळीसाठी थांबले
पायी जात असताना कैलास सोनवणे हे विठेवाडी परिसरातील भालचंद्र निकम यांच्या शेतात थांबले. या शेतात पाणी सुरु असल्याने ते पाहून थांबले. याठिकाणी त्यांनी अंघोळ केली. अंघोळ केल्यानंतर त्यांना सकाळी सुमारे ११ ते १२ वाजेच्या दरम्यान चक्कर आली आणि ते अंघोळीच्या ठिकाणीच कोसळले. यातच त्यांचा घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता
आजूबाजूच्या परिसरातील तसेच पायी जाणाऱ्या भाविकांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीवरून मृत्यूचे नेमके कारण उष्माघात किंवा हृदयविकाराचा झटका असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह दाखल करण्यात आला आहे. तर देवळा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT