Nashik News:  Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: धोंड्याच्या महिन्याचा हटके सोहळा! ६ बैलगाड्या, अन् टाळ मृंदुंगाचा गजर; लेक आणि जावयाची निघाली जंगी मिरवणूक

Dhonda Sohala In Nashik: नाशिकमधील एका बांधकाम व्यावसायिकाने लेकीची आणि जावयाची काढलेली जंगी मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिजित सोनावणे

Nashik News: दर 3 वर्षांनी अधिकचा महिना येतो. महाराष्ट्रात याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. यावर्षी तब्बल 19 वर्षांनी अद्भूत आणि दुर्मिळ योगा योग जुळून आला आहे. महाराष्ट्रात अधिक मासात जावयाला विशेष महत्त्व असतं. जावयाला सासरी बोलवून त्याचा मानपान केला जातो. याचनिमित्त सध्या नाशिकमधील एका बांधकाम व्यावसायिकाने लेकीची आणि जावयाची काढलेली जंगी मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

मुलीचा मान आणि जावयाला वाण अशा या धोंड्याच्या महिन्याला आता आधुनिक झळाळी मिळाली असली तरी नाशिकचे (Nashik) बांधकाम व्यावसायिक गौतम कांतीलाल हिरण यांनी तो पारंपारिक पध्दतीने मराठमोळया थाटात साजरा केला आहे. सध्या त्यांच्या खास धोंडा उत्सवाची सर्वत्र चर्चा होत आहे. धोंड्याच्या महिन्यानिमित्त त्यांनी जावई आणि मुलीची बैलगाडीतून मिरवणूक काढली.

त्यासाठी त्यांनी थेट सहा बैलगाड्या गावातून मागवल्या. त्याची सजावट करुन जावई आणि मुलीची त्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे त्यासाठी लेझिम पथक, हलगी, टाळ - मृंदुगाचा गजरही व्हावा, यासाठी कलाकारांना निमंत्रीत करण्यात आले होते. वाजत गाजत मुलगी आणि जावयाची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.

या हटके सोहळ्यात मुली आणि जावयासाठी मराठमोळा ड्रेस कोडही देण्यात आला होता. जावई धोतर, कुर्ता व टोपी परिधान केले होते तर मुलीने नववारीचा शृंगार केला होता. त्याचबरोबर रस्त्यावर रांगोळी आणि फुलांची सजवाट करण्यात आली होती. या सोहळ्यासाठी हिरण कुटुंबियातील मुलगी, तीन आत्या, १३ बहिणी आणि सर्व जावई सहभागी झाले होते. या आगळ्या वेगळ्या सोहळ्याची सध्या पंचक्रोशीच चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

तुम्हीही प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय? तर आत्ताच व्हा सावध! शरीरावर होऊ शकतात ५ गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

आमदार विकून मुख्यमंत्रिपद दिलं अन् त्याला लोकशाही म्हणता?; कपिल सिब्बल भडकले,आयोगाची कोंडी, युक्तिवादाचा शब्द ना शब्द

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन! शाळांना सुट्टी जाहीर, कार्यक्रम रद्द; राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT