Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिकमध्ये गढूळ, आळ्या मिश्रित पाणी पुरवठा; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

Nashik News : नविन नाशिक मधील रायगड चौक शिवनेरी गार्डन परिसरात पावसाळी रोगट वातावरणात गढूळ पाण्याची तक्रारी वाढत आहे.

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : पावसाळ्याचे दिवस असल्याने अगोदरच साथरोगांचा फैलाव होत आहे, शिवाय नाशिकमध्ये डेंग्यूचे रुग्ण अधिक असताना  नाशिक महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणा समोर येत आहे. नविन नाशिक भागातील रायगड चौक भागातील नागरिकांच्या आराेग्याशी खेळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. या भागात गढूळ व आळ्या मिश्रित पाणी पुरवठा केला जात असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नाशिक (Nashik) शहरातील बहुतांश भागात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. नविन नाशिक मधील रायगड चौक शिवनेरी गार्डन परिसरात पावसाळी रोगट वातावरणात गढूळ पाण्याची तक्रारी वाढत आहे. यामुळे रोगाचा प्रसार अधिक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे शहरात फारसा पाऊस नसतानाही नळातून गढूळ व आळ्या मिश्रित पाणी पुरवठा सलग २ ते ३ दिवसापासून होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पाण्यामुळे स्थानिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते.

महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना गढूळ पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मुळात नाशिकमध्ये डेंग्यू या आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असताना देखील पाणी पुरवठा (Water Supply) विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे; अशी नागरिकांची मागणी असून येत्या काळात मोठे आंदोलन उभरण्यात येईल असे सामाजिक कार्यकते तसेच नागरिकांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT