Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिकमध्ये मविआमध्ये बिघाडीची शक्यता; काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

Nashik News : महाविकास आघाडीकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली आहे.

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नाराजीनाट्य अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. अशात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील ठाकरे आणि काँग्रेसच्या वादात काँग्रेसने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

महाविकास आघाडीकडून नाशिक (Nashik) मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली आहे. या मतदारसंघात वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मध्य विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने केलेला दावा अद्याप सोडले नाही. यामुळे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. दरम्यान आज काँग्रेसने निर्धार मेळावा घेतला असून या मेळाव्याच्या दरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलून काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत लढण्यास तयार असल्याचं शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी म्हटले आहे. 

तसेच जागेबाबत चर्चा सुरू असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे मत काँग्रेसचे इच्छुक उमेदवार राहुल दिवे यांनी सांगितले. त्यामुळे नाशिक शहरात मध्याचे जागेवरून माविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता चर्चेनंतर काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

Onion Juice: जाड अन् घनदाट केस हवीयेत? लावा कांद्याचा रस, काही दिवसातच दिसेल फरक

EMI चा हप्ता थकवलात तर फोन होणार लॉक? आरबीआय नवा नियम आणणार, VIDEO

Ladki Bahin Yojana ekyc : पती, वडीलांचे e-KYC बंधनकारक; लाडकींची संख्या आणखी घटणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT