Dadaji Bhuse
Dadaji Bhuse Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: नाशिकमध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे: दादाजी भुसे

साम टिव्ही ब्युरो

Nashik News: हवामान खात्याने वर्तविलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार नागरिकांना ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टिने सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज पाणी टंचाई बाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुसे बोलत होते.

दादाजी भुसे म्हणाले, जून व जुलै महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी ऑगस्ट अखेरपर्यंत पुरविण्याबाबत शासनस्तरावरून आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांना विश्वासात घेवून गरजेनुसार आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याबाबतचा निर्णय आगामी काळात घेण्यात येईल, असे भुसे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

जिल्ह्यातील ज्या भागातील पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत, ती कामे तातडीने पूर्ण करावीत. जेणेकरून संभाव्य पाणी टंचाई काळात त्या पाणी पुरवठा योजनांचा नागरिकांना उपयोग होईल.

तसेच गावपातळीवरील नादुरूस्त विंधन विहिरींच्या दुरूस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. पाण्याचा वापर जपून करावा, तसेच पिण्याच्या पाण्याचा अपव्यव होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही दादाजी भुसे यांनी यावेळी केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : बारागाड्या ओढताना ५ जण जखमी; अक्षय तृतीयेला यात्रोत्सव समारोपावेळी अपघात

Google Maps: तुम्हालाही Offline Maps पद्धतीने गुगल मॅप वापरायचा? तर फॉलो करा 'या' स्टेप्स

Arvind Kejriwal gets interim bail: अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन, लोकसभा निवडणूक प्रचाराचा मार्ग मोकळा

Audi Q3: आकर्षक लूक अन् जबरदस्त फीचरसह क्‍यू३ आणि ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक बोल्‍ड एडिशन लाँच

Dhule Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 432 मतदारांनी बजावला हक्क

SCROLL FOR NEXT