Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : बांधकाम कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू; नाशिकमध्ये दोन दिवसांत दुसरी घटना

Nashik News : मुले खेळत असताना या खड्ड्यात नऊ वर्षीय मुलगा पाय घसरून तो पडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत आझाद शेख या युवकाने खड्ड्यात उडी घेत बुडणाऱ्या मयूर संजय भोंडवे या शाळकरी मुलाला बाहेर काढले

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: दोन दिवसांपूर्वी खोदण्यात आलेल्या कृत्रिम खड्ड्यात तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पडून एका ९ वर्षीय मुलाचा मूत्यू झाल्याची धाकादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. दोन दिवसांत हि दुसरी घटना असून यात चार अल्पवयीन मुलांचा मूत्यू झाला आहे.

नाशिक अंबड लिंकरोडवरील सातपूर शिवारात असलेल्या भोर टाऊनशिपजवळ मोकळ्या मैदानात सदरची घटना घडली आहे. या घटनेत मयूर संजय भोंडवे (वय ९) असे खड्ड्यात बुडून मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान खड्ड्यात पाणी साचलेले होते. याच परिसरात तीन ते चार शाळकरी मुले खेळत होती. जवळच एका गृहप्रकल्पासाठी खोदललेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावासाचे पाणी साचलेले होते. 

बुडणाऱ्या मयूरला बाहेर काढले पण.. 

मुले खेळत असताना या खड्ड्यात नऊ वर्षीय मुलगा पाय घसरून तो पडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत आझाद शेख या युवकाने खड्ड्यात उडी घेत बुडणाऱ्या मयूर संजय भोंडवे या शाळकरी मुलाला बाहेर काढले. यानंतर त्यास शासकिय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आपत्कालीन कक्षात रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. 

दोन दिवसात चार मुलांचा बळी 

दोन दिवसांत ही दुसरी घटना नाशिक शहरात घडली आहे. विडी कामगार नगरमधील अमृतधाम येथे गृहप्रकल्पाच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेची पुनरावृत्ती बुधवारी सातपूर भागात झाली. केवळ बिल्डरांच्या निष्काळजी पणामुळे मुलांचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खरातशी एकनाथ शिंदेंचं थेट कनेक्शन; राष्ट्रवादी-शिवसेनेला धडा शिकवण्यासाठीच कारवाईचे आदेश, श्याम मानव यांचा आरोप

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

Terror Alert : मोठी बातमी! टॉय कारमध्ये IED ठेवून हल्ल्याचा कट; महाराष्ट्र कनेक्शन उघड, ३ राज्यांतून चौघांना बेड्या

High Blood Pressure : BP कंट्रोल करण्यासाठी लाइफस्टाइमध्ये आताच करा 'हे' ५ बदल, औषधांची गरजही भासणार नाही

Famous Actor Video : वाढलेले केस अन् हातात सुटकेस; बॉलिवूडचा सुपरस्टार रस्त्यावर भटकतोय, अवस्था पाहून ओळखणंही कठीण

SCROLL FOR NEXT