Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : त्र्यंबकेश्वरमध्ये साधू व वारकऱ्यांमध्ये वाद; तंबू उखडत हाकलून लावल्याचा वारकऱ्यांचा आरोप 

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे उद्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पौष वारीचा मुख्य दिवस आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौष वारीला दरवर्षी त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो वारकरी येतात

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पौष वारीचा मुख्य दिवस असल्याने अनेक वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. मात्र वारकऱ्यांची अडवणूक होत असल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये साधू आणि वारकऱ्यांमध्ये (Nashik) वाद झाल्याचा प्रकार घडला आहे. साधूंनी शिवीगाळ केल्याचा आरोप देखील काही वारकऱ्यांनी लावला आहे. (Live Marathi News)

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे उद्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पौष वारीचा मुख्य दिवस आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौष वारीला दरवर्षी त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimabakeshwar) हजारो वारकरी येतात. त्यानुसार उद्या हा दिवस असल्याने पौष वारीसाठी राज्यभरातून त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो वारकरी दाखल झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे थांबण्याच्या ठिकाणी तंबू उभारून वारकरी थांबले आहेत. याच ठिकाणी थांबण्यावरून वाद निर्माण झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तंबू उखडत शिवीगाळ केल्याचा आरोप 

निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला आलेल्या वारकऱ्यांची त्रंबकेश्वरमध्ये साधूंकडून अडवणूक केली जात आहे. ज्या ठिकाणी वारकरी थांबले होते त्या ठिकाणी येऊन साधूंनी हाकलून लावत शिवीगाळ केल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे. तसेच हातात चाकू घेऊन साधूंनी वारकऱ्यांचे तंबू उखडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT