Dog Attack: नाशिकमध्ये जर्मन शेफर्डचा धुमाकूळ; ५ बालकांचा घेतला चावा

Dog Attack On Children: जेलरोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शेफर्ड जातीच्या एका कुत्र्याने लहान मुलांवर हल्ला करून त्यांचा चावा घेतलाय. या घटनेत लहान मुलं जखमी झाले आहेत.
Dog Attack
Dog Attack Saam Tv
Published On

Dog Attack On Children At Jailroad Nashik

नाशिकमध्ये जेलरोड परिसरात शेफर्ड जातीच्या कुत्र्यानं (German Shepherd Dog) पाच लहान मुलांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. जखमी मुलांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या दोन पथकांनी शनिवारी तीन तास शोध घेतला, तरी हा कुत्रा सापडला नाही. या घटनेबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Marathi News)

नाशिकच्या जेलरोड (Jailroad Nashik) परिसरात एका कुत्र्याने पाच लहान मुलांचा चावा घेतलाय. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलांना उपचारासाठी महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालामध्ये तसंच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शेफर्ड जातीच्या भुऱ्या रंगाच्या कुत्र्यानं हा हल्ला केलाय. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेफर्ड जातीच्या कुत्र्याचा हल्ला

याबाबत नागरिकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर महापालिकेच्या दोन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. या कुत्र्याचा तीन तास शोध घेतला, पण ते कुत्रे सापडले (Dog Attack On Children) नाही. कर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेऊन आहेत. या कुत्र्याने जेलरोडला आणखी कोणाला चावा घेतलाय का, याचाही शोध सुरु आहे.

जेलरोडच्या राजाराम नगर, वज्रेश्वरी नगर, टाकेकर वसाहत, सातभाई नगर, जेलरोड टाकी परिसरात या कुत्र्याने क्लासहून घरी जाणाऱ्या तसंच बाहेर खेळणाऱ्या या बालकांना चावा (Dog Attack) घेतला आहे. पालक आणि रहिवाशी लगेच धाऊन आल्यामुळे या मुलांचे प्राण वाचले आहेत. कुत्र्याच्या भितीमुळे पालक मुलांना बाहेर पाठविण्यास टाळत आहेत.

Dog Attack
Dog Attack Video: आजोबांच्या मांडीवरुन चिमुकलीला हिसकावले...कुत्र्यानं लचके तोडले; थरकाप उडवणारा VIDEO

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

आयुष महंत (वय १२ राहणार राजाराम नगर, गणेश व्यायाम शाळा, जेलरोड) अद्वैत शिंदे वय (वय ८), प्रणव खरोटे (वय ८), ऋषीराज पुरोहित (वय ८), आरोही संवत्सरकर (वय ४) अशी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलांची नावं आहेत. या घटनेमुळे पालक वर्गातही चांगलीच भिती निर्माण झाली (Dog Attack Nashik) आहे.

या जखमी मुलांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेलं आहे. या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त न केल्यास तो आणखी मुलांवर हल्ला करेल. त्यामुळे जेलरोडच्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. या कुत्र्याची दहशत चांगलीच पसरली आहे.

Dog Attack
Dog Chased Leopard: मालकासाठी पाळीव कुत्र्यानं घेतला बिबट्याशी पंगा! वाचवले संपूर्ण कुटुंबाचे प्राण, पंचक्रोशीत चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com