pune crime news  saam tv
महाराष्ट्र

नाशिकमध्ये अफगाणी सुफी युवकाची गोळ्या झाडून हत्या

घटनास्थळावरून चौघा अज्ञात इसमांनी चारचाकी गाडी घेऊन पोबारा केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला तालुक्यातील चिचोंडी येथील आद्योगिक वसाहत परिसरात काल (मंगळवारी) एका अफगाणी युवकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती अस या अफगाणी युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून चौघा अज्ञात इसमांनी चारचाकी गाडी घेऊन पोबारा केला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही हत्या झाली. ही हत्या गोळ्या झाडून झाली आहे, सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती अस या अफगाणी युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून चौघा अज्ञात इसमांनी चारचाकी गाडी घेऊन पोबारा केला आहे.

या घटनेची माहिती येवला शहर पोलिसांना मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तसेच पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान या अफगाणिस्तानी नागरिकाची चिचोंडी एमआयडीसी परिसरात हत्या का झाली? कशासाठी झाली? घटनास्थळी एका भूखंडावर नारळ फोडून, अगरबत्ती लावून, कुंकू डबी मिळून आली आहे. पूजेचा प्रकार कशासाठी करण्यात आला होता. या सर्व बाबी गुंतागुंतीच्या असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

रात्री उशिरा फॉरेन्सिक लॅब तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. खून झालेल्या युवकाबरोबर असलेला त्याचा मित्र गफार आणि आणखी एकाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक..

दुष्काळात शेतकरी संकटात, पण ‘गोकुळ’च्या ठरावधारकांची चंगळ; एका ठरावासाठी लाखाची बोली?

Makeup Powder: मेकअप पावडर निवडताना गोंधळ होतोय? तुमच्या स्किन टाइपनुसार अशी निवडा परफेक्ट पावडर

Milk tea: एकदा बनवलेला चहा किती तासांनी खराब होतो?

भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे होणार पुनरागमन; मोदी मंत्रिमंडळात वर्णी लागणार? घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT