Nashik News  Saam Digital
महाराष्ट्र

Nashik News : पाय घसरून विहिरीत पडली ३ वर्षांची चिमुकली; वाचवण्यासाठी आईनेही घेतली उडी: दोघींचाही बुडून मृत्यू

Nashik News Update : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी,मुंढेगावमध्ये ह्रदयद्रावक घटना घडली आहे. विहिरीत पडलेल्या आपल्या ३ वर्षांच्या मुलीला वाचवताना मुलीसह आईचाही बुडून मृ्त्यू झाला आहे.

Sandeep Gawade

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी,मुंढेगावमध्ये ह्रदयद्रावक घटना घडली आहे. विहिरीत पडलेल्या आपल्या ३ वर्षांच्या मुलीला वाचवताना मुलीसह आईचाही बुडून मृ्त्यू झाला आहे. दोघीही जवळच असलेल्या शेनवड खुर्द येथील रहिवाशी असून ग्रामस्थांनी मायलेकीचे मृतदेह विहिरीत आढळून आले आहेत. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २३ वर्षीय महिला पाणी आणण्यासाठी आपल्या ३ वर्षांच्या चिमुकलीसह शेतात गेली होती. मुलीला बाजूला ठेवून ही महिला शेतातील विहिरीतील पाणी ओढत होती. त्यावळी तीची मुलगी अचानक विहिरीत पडली. मुलीला वाचविण्यासाठी त्या महिलेने जीवाच्या आकांताने विहिरीकडे धावली आणि स्वत:ला सरळ विहिरीत झोकून दिलं. आजूबाजूला कोणीचं नव्हतं त्यामुळे त्या दोघींचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला.

याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी शेतातील त्या विहिरीकडे धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. कालच भावली धरणात पाच जणाचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somvar Upay: सोमवारच्या दिवशी शंकराचे करा 'हे' उपाय; देवी लक्ष्मी स्वतः येईल घरी

Maharashtra Live News Update: पुणेकरांसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे, अति मुसळधार पावसाची शक्यता

PGCIL Recruitment: ना परीक्षा, ना मुलाखत, थेट मिळणार सरकारी नोकरी; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Marathi Serial : लोकप्रिय मराठी मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, दीड वर्षातच गाशा गुंडाळला

Red Alert : मुंबई, ठाणे रायगडला 4 तासांसाठी रेड अलर्ट | VIDEO

SCROLL FOR NEXT