Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : सप्तशृंगी गडावरून २ क्विंटल भेसळयुक्त मावा पेढा, मिठाई जप्त; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

Nashik News : सध्या चैत्र पौर्णिमा असल्याने भाविक देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात आहेत. येथे येणार प्रत्येक भाविक हा प्रसाद म्हणून मावा पेढा व प्रसिद्ध असलेली हलवा मिठाई घेत असतो.

अभिजित सोनावणे

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर येणारे भाविक येथे विक्रीसाठी असलेले पेढे, मिठाई खरेदी (Nashik) करत असतात. परंतु हा मावा पेढा व हलवा मिठाई भेसळयुक्त केली जात असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करत येथून तब्बल १ हजार ९४४ किलो मिठाई जप्त केली आहे. (Breaking Marathi News)

सध्या चैत्र पौर्णिमा असल्याने भाविक देवीच्या दर्शनासाठी नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात आहेत. येथे येणार प्रत्येक भाविक हा प्रसाद म्हणून मावा पेढा व प्रसिद्ध असलेली हलवा मिठाई घेत असतो. मात्र या मिठाईत भेसळ केली जात असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार हि कारवाई करण्यात आली आहे. (FDA) अन्न व औषध प्रशासनाची सप्तशृंगी गडावर हि आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाच दुकानदारांवर कारवाई 

सप्तशृंगी गडावर मावा पेढ्याच्या नावाखाली बर्फी विक्री केली जात होती. चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून सप्तशृंगी गडावरील ५ विक्रेत्यांवर एकाच वेळी छापे टाकून कारवाई करण्यात आली असून अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत १९४४ किलो भेसळयुक्त मावा पेढा व हलवा मिठाई जप्त करत जवळपास सहा लाख रुपयांची भेसळयुक्त मिठाई नष्ट केली जाणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT