Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: गंगापूर धरणावर फिरायला गेला, पुन्हा परतलाच नाही; ईदच्या दिवशी घडली भयनाक घटना

Nashik News: नाशिकच्या गंगापूर धरणात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

तबरेज शेख

Nashik News: देशभरात एक महिन्याच्या कठोर उपवसानंतर आज मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या उत्साहात ईद साजरी करत आहेत. अनेकांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाशिक शहरातही सर्वत्र मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे मात्र नाशिकमधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

नाशिकमध्ये ईदच्या दिवशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या गंगापूर धरणात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. शेहबाज नेहमत अली खान असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिक शहरातही सर्वत्र मुस्लिम बांधवांकडून ईद साजरी केली जात आहे. या ईदच्या निमित्ताने शेहबाज आणि त्याचे मित्र घराबाहेर पडले. नाशिकमधील हे पाच जण ईदनिमित्त गंगापूर धरणावर फिरायला गेले.

धरण परिसरात गेलेल्या या पाच जणांपैकी एकाचा दुर्दैवाने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 14 वर्षीय शेहबाज नेहमत अली खान या अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला.

5 मुले ईद निमित्त नाशिकच्या गंगापूर धरणावर फिरायला गेले होते. यातील एका तरुणाचा मृत्यू तर बाकी 4 तरुण सुखरूप बचावले आहेत. धरण परिसरात गेलेले मुले हे नाशिकच्या विहितगाव परिसरातील रहिवासी आहेत.

या मुलांनी गुगलवर सर्च करून गंगापूर धरण शोधलं. या दुर्घटनेत 14 वर्षीय शेहबाज मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

SCROLL FOR NEXT