Nashik Nagarparishd And Nagarpanchayat Election Result Saam Tv
महाराष्ट्र

Nashik : नाशिकच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा दबदबा! भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काय झालं? वाचा

Nashik Nagarparishd & Nagarpanchayat Election Result : नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक निकालात शिंदेंच्या शिवसेनेने ११ पैकी ५ नगराध्यक्षपदे जिंकत वर्चस्व स्थापित केले.

Alisha Khedekar

  • नाशिक जिल्ह्यात ११ पैकी ५ नगराध्यक्षपदे शिंदेंच्या शिवसेनेकडे

  • भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी प्रत्येकी ३ जागांवर विजयी

  • महाविकास आघाडीचा पूर्ण पराभव

  • शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा उत्साह

राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचा आज सकाळी १० वाजल्यापासून निकाल सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील ११ पैकी ११ जागांचा निकाल आता समोर आला असून शिंदेंच्या शिवसेनेचा सर्वाधिक विजय झाला आहे. ११ पैकी तब्बल ५ जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आला आहे. तर भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी आहे.

नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि भाजपला प्रत्येकी ३ नगराध्यक्षपदाच्या जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. तर शिंदेंच्या शिवसेने ११ पैकी तब्बल ५ जागांवर विजय मिळवत ११ पैकी एकही नगराध्यक्ष पदाची जागा राखता न आल्याने महाविकास आघाडीचा नाशिकच्या नगरपरिषद निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. दरम्यान नाशिकच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा विजयी झेंडा फडकला आहे. तसेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

नाशिक जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले?

जिल्ह्यातील एकूण नगराध्यक्षपदं – ११

भाजप - ३

शिंदेंची शिवसेना - ५

अजित पवार राष्ट्रवादी - ३

काँग्रेस - ००

ठाकरेंची शिवसेना - ००

शरद पवार राष्ट्रवादी - ००

इतर – ००

नाशिक जिल्हा ११ नगर परिषद निकाल

  • भगूर - अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी

  • येवला - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी विजयी

  • सिन्नर - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विट्ठलराजे उगले विजयी

  • नांदगाव - शिंदेंच्या शिवसेनेचे सागर हिरे विजयी

  • इगतपुरी - शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खातळे विजयी

  • सटाणा - शिंदेंच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील विजयी

  • त्र्यंबकेश्वर - शिंदेंच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार विजयी

  • मनमाड - शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश पाटील विजयी

  • चांदवड - भाजपचे वैभव बागुल विजयी

  • पिंपळगाव बसवंत - भाजपचे डॉ. मनोज बर्डे विजयी

  • ओझर - भाजपच्या अनिता घेगडमल विजयी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये कुणी मारली बाजी? कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक? वाचा संपूर्ण लिस्ट

सावधान! रात्रीच्या वेळी 'हे' पदार्थ खाणे टाळा; अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Sangli : तासगावमध्ये आमदार रोहित पाटील यांना मोठा हादरा, सत्तेत येताच संजयकाका पाटलांचा गंभीर आरोप

Maharashtra Nagar Palika Election Result Live: अंजनगाव सुर्जी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पराभव, काँग्रेसचा निवडणुकीवर आक्षेप

Rohit Pawar: कर्जत जामखेडमध्ये मोठा उलटफेर! राष्ट्रवादीचा पराभव; भाजपच्या विजयानंतर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT